पवनीतील अतिक्रमणावर खासदार पटेल यांची जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - येथील परकोट परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा सध्या उग्र रूप धारण करीत असून अतिक्रमण काढण्याच्या कार्यवाहिला सर्व स्तरातून विरोध होत आहे. या विषयावर आज दिनांक 24 मे 2025 ला राष्ट्रवादी चे नेते खासदार प्रफुल पटेल यांना पवनी येथील अतिक्रमणधारकासह राष्ट्रवादी चे नेते यांनी भेट घेऊन आपबिती सांगितली असता थांबविण्यात यावी यावर जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा केली.
पवनी येथील परकोट क्षेत्रातील नागरिकांचे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने 183 कुटूंबियांना नोटीस पाठवून सात दिवसाच्या आत अतिक्रमण काढण्याची तंबी दिली. या प्रकाराला घाबरून अतिक्रमणधारक सैरावैरा होऊन मिळेल त्या मार्गाने होणारी कार्यवाही थांबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक सामाजिक संघटनांनी यात प्रत्यक्ष सहभाग घेतला. यातच काही अतिक्रमणधारकांनी राष्ट्रवादी चे नेते शैलेश मयूर यांची भेट घेऊन अतिक्रमणाचा मुद्दा खासदार पटेल यांचेकडे मांडण्याची विनंती केली.
अतिक्रमणधारकाची आपबिती ऐकून खासदार पटेल यांची अतिक्रमणधारकासह गोंदिया येथे भेट घेवून यावर तोडगा काढण्याविषयी चर्चा करून निवेदन दिले. नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन खासदार पटेल यांनी तात्काळ भंडारा चे जिल्हाधिकारी यांचेशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही तात्काळ थांबविण्यात यावी. तसेच समोरची कार्यवाही करताना माझे उपस्थितीत लोकप्रतिनिधी ची बैठक लावून काय तो निर्णय घ्यावा असे सांगितले. निवेदन देतेवेळी शैलेश मयूर, तुषार रंगारी, महादेव शिवरकर, मनोज शांतलवार, निर्देश नंदागवळी, वंदना खापर्डे, वंदना नंदागवळी यांचेसह पंचवीस चे वर अतिक्रमण धारक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!