घाटावरून रेती कधी आणू जी साहेब... - रायल्टी घेऊन घरकुलधारकांच्या रेतीसाठी चकरा


सावली - घरकुलधारकांना ५ ब्रास मोफत देण्याचा शासकीय परिपत्रक असल्याने सावली तालुका प्रशासनाने गाजावाजा करीत वाहतूक परवाने घरपोच वाटप केले. आता रेती मिळणारच म्हणून लाभार्थ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या मात्र तेच वाहतूक परवाने घेऊन लाभार्थी रेती कधी आणू जी साहेब... म्हणत तलाठी, ग्रामसेवक यांचेकडे चकरा मारत असल्याचे चित्र तालुक्यात आहे.

       तालुक्यात प्रधानमंत्री आवास, शबरी आवास, यशवंतराव चव्हाण आवास, रमाई आवास योजनेनंतर्गत हजारो घरकुल मिळाले, पण रेतीचे काय असा प्रश्न अनेक घरकुल लाभार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे. रेतीच्या टंचाईमुळे अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरू केले नाही तर काहींनी अधिकच्या भावाने चोरीची रेती खरेदी करून बांधकाम सुरु केले मात्र तेही अर्धवट आहेत. शासनाने घरकुलधारकांना ५ ब्रास रेती देण्याचा निर्णय घेतला. तालुका प्रशासनाचे प्रमुख तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी तर ५ मे पासून रेती वाटप करण्याचे आदेशच तलाठी यांना दिले होते मात्र त्यासाठी कोणतेच नियोजन नसल्याने शो प्लॉप ठरला. आता लोकांची बोंब सुरु झाल्याने आम्हीच जिल्ह्यात नंबर एकवर असल्याचा तालुका प्रशासनाने हाव आणित घरकुलधारकांना घरपोच वाहतूक परवाने २१ मे पासून वाटप सुरु झाले. लाभार्थी रेतीच्या आशेने तलाठी, ग्रामपंचायत मध्ये वाहतूक परवान्याचा कागद घेऊन साहेब घाटावरून रेती कधी आणू जी.. म्हणत विचारत आहेत. मात्र जे घाट निश्चित केले पावसामुळे त्या घाटावरून गाडी जाऊ शकत नाही, नदीत पाणी आहे, शेतीतून रस्ता असल्याने शेतकरी अडवीत असल्याच्या अडचणी आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!