विद्युत तारेच्या स्पर्शाने ८ जनावरांचा मृत्यू - शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

सावली - तालुक्यातील उसेगाव येथील चरायला गेलेल्या ६ बैल व २ गाईंना शेतशिवारातील तुटून पडलेल्या विद्युत तारेचा झटका लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या अपघातात कालीदास पाल १ बैल, बाळुजी ठुसे १ बैल, संतोष भोयर १ गाय, देवाजी भोयर १ बैल, हिराजी गोहणे १ गाय, माणिक गोहणे १ बैल, अरुण भोयर १ बैल, भोजराज गोहणे १ बैल यांची जनावरे ठार झाले असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे. ऐन शेतीच्या हंगामात जनावरे मरण पावल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!