"मूल नगर परिषदेत 'नाना' प्यादा; सूत्रधार माजी पदाधिकारी?"
"नोकरीचं आमिष, जमीन दलाली आणि आत्महत्या – मूल नगर परिषदेतील काळं चित्र!"
"8411973907 चा CDR उघडेल कोट्यवधींच्या घोटाळ्याचे गूढ!"
"मूल नगर परिषदेत 'नाना' प्यादा; सूत्रधार माजी पदाधिकारी?"
मूल (प्रतिनिधी) –
मूल नगर परिषद ही स्थापना होताच वादग्रस्त बनली असून, सुरूवातीपासूनच घोटाळ्यांचे सत्र थांबलेले नाही. नगर परिषद स्थापनेनंतर प्रशासक नियुक्त करण्यात आला. परंतु त्याच काळात मोठ्या प्रमाणावर अनियमितता घडल्याचे समोर आले आहे.
प्रशासकाच्या काळातच भरती घोटाळा
प्रशासक कार्यकाळात गरजेपेक्षा अधिक आणि मंजूरीशिवाय कर्मचारी भरती करण्यात आली. यामध्ये मोठ्या आर्थिक देवाण-घेवाणीचा आरोप होता. उत्पन्नापेक्षा कर्मचार्यांच्या पगारावर खर्चच अधिक होत असल्यांने, अनेकदा, चार—चार महिणे कर्मचार्याचे पगार होत नव्हते. या परिस्थितीचा फायदा करीत, मूल नगर परिषदेतील नौकरीशिवाय इतर व्यवसाय करणारे "विलासी" जीवन जगणारे श्रीमंत कर्मचाऱ्यांनी 'सावकारी' सुरू केली.
काही कर्मचारीच बनले सत्ता-विकृत दलाल
चार-पाच कर्मचाऱ्यांचा एक 'गट' नगर परिषदेतील सत्तेचा गैरवापर करून केवळ श्रीमंतीच्या हव्यासापोटी अनेक आर्थिक अनियमिततेत सामील झाला.
- गरीब कर्मचार्यांना दिड-दुपटीने व्याजावर कर्ज देणे
- पगारातून बळजबरीने कपात
- नोकरीवरून काढण्याची धमकी देणे
- असे प्रकार या गटाकडून सर्रास घडत होते.
बनावट घरटॅक्स पावत्या आणि आत्महत्या
या 'गटा'ने बनावट घरटॅक्स पावत्या छापून लाखो रुपयांची अफरातफर केली. या प्रकरणात अत्यंत साधा, निर्व्यसनी देविदास नावाच्या निष्पाप नाहक फसविल्या गेला. समाज, प्रशासन आणि सहकाऱ्यांच्या दबावामुळे त्याने आत्महत्या केली, या बनावट पावत्या छापून देणारा रवी पोलिसी जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या एका प्रकरणात दोन निर्दोष जीवाचा नाहक बळी गेला. ही अत्यंत हृदयद्रावक घटना संपूर्ण मूलकरांच्या मनात खोल जखम करून गेली आहे.
मालमत्ता फसवणूक आणि दलाली
येथील एक—दोन कर्मचार्यांनी अनेक नागरिकांच्या मालमत्तांमध्ये स्वतःच्या नावे फेरफार करून हडप केल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. मूल येथे इंदिरा नगर मधील गुजराती समाजाच्या महिलेचे घर या कर्मचार्यांचे अनेक परस्पर मालमत्ता फेरफार करून, आपल्या ताब्यात घेतली. सावली तालुक्यातील जीबगांव येथील महिलेने आपले घर आपले नावांवर करावे यासाठी खुप प्रयत्न केले, मात्र तीला यश मिळाले नाही. नगर परिषदेमधील कामकाज सोडून याच गटाने जमिनीच्या खरेदी-विक्रीची दलाली सुरू केली. एवढा पैसा जमा झाला की अनेक अधिकारीसुद्धा या कर्मचाऱ्यांकडून उसणे घेऊ लागले.
सार्वजनिक जागांवर अतिक्रमण
एक जबाबदार कर्मचारी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करत दुकानांची खोली उभारून त्या भाड्याने देत आहे. नगर परिषदेचे गाळे बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवून भाड्याने देणे हा या विलासी कर्मचार्यांचा आणखी एक प्रताप आहे.
'विनोद'चा अनुकंपा घोटाळा
या सगळ्या प्रकारात आणखी एक नाव पुढे आले आहे – 'विनोद'.
हा कर्मचारी नगर परिषदेत अनुकंपा तत्वावर नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवत नागरिकांकडून लाखो रुपये उकळत होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काही काळ तो विजनवासात गेला. मात्र सध्या पुन्हा संपर्कात येऊ लागल्याची माहिती मिळत आहे. कर्मचार्याचे जीपीएफचे पैसे काढून देणे, थकीत वेतनाचे ऐरीयस काढून देणे यासाठी मोठी रक्कम हा विनोदवीर घेत असल्याचा आरोप होता.
बनावट जाहिरात भरतीचे 'नाना' प्रकरण !
अलिकडे 'राजेश' नावाच्या कर्मचार्याने नगर परिषदेत भरती असल्याची बनावट जाहिरात व्हॉट्सअॅपवर फिरवली. गरजू ग्राहक शोधत त्यांना नौकरी पाहीजे असेल तर, 8411973907 या क्रमांकावर 'वड्याले साहेब' नावाच्या व्यक्तीशी संपर्क करावा, असे सांगत.
युवकांनी 8411973907 या क्रमांकावर 'वड्याले साहेबाशी' संपर्क साधताच 'नाना' नावाचा व्यक्ती आर्थिक व्यवहार करत होता. ठरलेला रेट घेऊन लाखो रुपये उकळले गेले. या प्रकरणात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल झाल्याची जोरदार चर्चा आहे.
मुख्याधिकारींचा खुलासा आणि संशयाचे धुके
प्रकरण उघड झाल्यावर मुख्याधिकाऱ्यांनी प्रेस नोट काढून ही जाहिरात बनावट असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहनही केले.
'नाना' हा केवळ अल्पशिक्षित कंत्राटी कामगार आहे. नानाला लाखो रूपये देवून त्याचेवर विश्वास करावा असे ते व्यक्तीमत्व नाही. इतक्या मोठ्या आर्थिक फसवणुकीचा तो केवळ 'प्यादा'च असल्याची शंका उपस्थित होते. या प्रकरणाचे खरे सूत्रधार नगर परिषदेतील दोन माजी पदाधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. यातील एक तर 'तोडपाणी' करण्यात तरबेज असून, त्याचेच 'नाना'ला 'पाठींबा असल्याचा आरोप आहे.
फोन क्रमांकाचा तपास महत्त्वाचा ठरणार
8411973907 या नंबरचा सीडीआर (Call Detail Record) तपासला, तर अनेक "अंडेपिल्ले" बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपास यंत्रणांनी वेळीच लक्ष घालून या प्रकरणाचा सखोल छडा लावणे आवश्यक आहे.






धक्कादायक बाब, सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि दोषींना गजाआड टाकायला पाहिजे
उत्तर द्याहटवातुमच्या बातम्या वाचण्यासारख्या असतात तुम्ही कोणत्याही मुद्दावर त्वरित बातमी न लावता सखोल अभ्यास पूर्वक बातमी देता धन्यवाद
उत्तर द्याहटवा