त्रस्त नागरिकांनीच केला पोलखोल विडिओ वायरल..

शेगाव बु ग्राम पंचायत नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अपयशी...

त्रस्त नागरिकांनीच केला पोलखोल विडिओ वायरल..

वरोरा... जगदीश पेंदाम

वरोरा तालुक्यातील शेगाव बु ग्रामपंचायत नेहमीच गावकाऱ्यांना सुविधा देण्यात अपयशी ठरत आहे. येथील पदाधिकारी, व या आधी असलेल्या ग्रामसेवक यांच्या संगणमताने गावाचा विकास कमी व स्वतःचा विकास जास्त अशा प्रकारची विडिओ पोस्ट सध्या  सोशल मीडियावर व्हायरल चांगलीच होत आहे. आधीच शेगाव बु गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नळाचे शुद्ध पाणी मिळत नाही. 15 दिवसातून एकदा नळाला पाणी येते त्यातही ते पाणी पिण्या योग्य येईल याची कुठलीही शास्वती नाही. ग्रामपंचायत काडून नागरिकांना स्वच्छता सुविधा सुद्धा पूरविल्या जात नाही. गावात एकही स्वच्छता गृह नागरिकांना सुविधेसाठी उपलब्ध नाही. उन्हाळा संपत आला तरी ग्रामपंचायत कडुन अद्यापही नालितला गाळ स्वच्छ करण्यात आलेली नाही. मागील वर्षी सुद्धा अश्याच प्रकारे नाल्यांची अर्धवट सफाई करण्यात आली होती. गावा मध्ये हर घर नळ योजनेसाठी गावातील सम्पूर्ण रस्त्याचे तीनतेरा वाजवण्यात आले ते अजूनही व्यवस्थित करण्यात आले नाही. रोज रस्त्यावर जाता येता  अडखळून पडल्याने गावातील नागरिकांना छोट्या मोठ्या दुखापत होत आहे. परंतु गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांना गावातील नागरिक त्यांचे आरोग्य यांच्याशी कसल्याच प्रकारचे घेणेदेने नाही हेच चित्र सध्या शेगाव बु या गावात दिसत आहे.
त्यामुळे गावकऱ्यांमध्ये सध्या प्रचंड संताप व्यक्त होत आहे. त्यातच काल झालेल्या मान्सून पूर्व पाऊसामुळे गाव ठिकठिकाणी गावतळे निर्माण झाले होते. व नाल्यातील कचरा मोठ्या प्रमाणात गावातील रस्त्यावर आला होता. ज्या मुळे आता गावातील काही तरुण पिढीचा संयमचा बांध फुटला व मनातील सगळं राग व गावातील असलेल्या ग्रामपंचायत च्या भोंगळ कामाचा व काही व्यवहारांचा झालेल्या प्रकारावर विडिओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात शोषल मीडिया वर व गावातील व्हाट्सअप ग्रुप वर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. 
त्यामुळे या सगळ्यामुळे गावातील नागरिकांच्या मनातं असलेला गावातील ग्रामपंचायत च्या पदाधिकारी व अधिकारी यांच्या बद्दल चा रोष मात्र पाहायला मिळत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!