ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
फेब्रुवारी 2026 मध्ये ग्रामपंचायत चा कार्यकाळ संपणार
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - 2021 मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच तसेच सदस्यांच्या कार्यकाळ फेब्रुवारी 2026 मध्ये संपणार असून नव्याने होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तालुक्यातील 81 ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंच पदाचे आरक्षण पंचायत समिती कार्यालय सभागृहात काढण्यात आले. यामध्ये एससी 6....3 महिला +3 जनरल (महिला, पुरुष) एस टी 20..10 महिला, 10 जनरल, नामाप..14.. 7 महिला 7 पुरुष जनरल..41..21 महिला 20 जनरल याप्रमाणे आरक्षण 81 ग्रामपंचायत चे जाहीर करण्यात आले आहे.गावाच्या विकासाचे केंद्रबिंदू समजले जाणारे ग्राम पंचायत कार्यकारी प्रमुख सरपंच असतो, यापूर्वी सरपंचाची निवड ही निवडून आलेल्या सदस्या मधून केली जात असायची परंतु 2017 पासून यामध्ये बदल करण्यात आला असून आता जनतेमधून सरपंच यांची निवड करण्यात येत आहे, जिल्हाधिकारी यांनी 25 एप्रिल 2025 पत्रानुसार नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग, ओबीसी तसेच महिलांसाठी राखीव असलेल्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले, यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायत चे सरपंच,सदस्य यांनी पंचायत समिती परिसरात उपस्थिती दर्शवली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!