रानडुकराच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी
शेतात काम करीत असतांना ची घटना
तालूका - प्रतिनिधी ( यश कायकर )
नागभीड : - तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील तळोधी येथील शेतात हा तरुण मजूर म्हणून काम करण्यासाठी गेला होता. त्यानंतर बाळापूर येथील रहिवासी १९ वर्षीय आकाश बळीराम भानारकर हा लखमापूर जवळील गावाजवळ शेतात काम करत असताना एका रानडुकराने त्याच्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. त्यामुळे त्याच्या दोन्ही पायांना आणि छातीला गंभीर दुखापत झाली. यानंतर लगेचच त्यांना जखमी अवस्थेत तळोधी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. स्वाब संस्थेच्या बचाव पथकाचे प्रमुख जीवेश सयाम यांना ही माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाला कळवण्यात आले आणि त्यानंतर लगेचच वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक अरविंद माने आणि वनरक्षक चौधरी आणि स्वाब अध्यक्ष कैरकर रुग्णालयात पोहोचले आणि गंभीर अवस्थेत असलेल्या जखमी तरुणाला पुढील उपचारांसाठी गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!