सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दिनांक.१४/०४/२०२५ ला पवनी येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी. जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांनी तथा विद्यार्थांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदराने अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
यावेळी विद्यार्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित भाषणे सादर केली. त्यांच्या प्रेरणादायी विचारांना उजाळा देत, 'शिक्षण हेच परिवर्तन घडवणारे सर्वात मोठे शस्त्र आहे' या त्यांच्या संदेशाचे महत्त्व विशद केले.काही विद्यार्थांनी भीमगीते सादर करून वातावरणात चैतन्य निर्माण केले.मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाला आदराने स्मरण केले.त्या म्हणाल्या, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत आणि एक सुजाण नागरिक म्हणून जबाबदारीने वागण्याची शिकवण देतात."
कार्यक्रमाला विद्यालयातील राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला नमन करून त्यांच्या स्वप्नातील प्रगतीशील आणि समतावादी समाजाच्या निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला.एकंदरीत, सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम प्रेरणादायी आणि उत्साहाने परिपूर्ण होता.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिद्धेश्वर फड यांनी केले तर आभार संदिप मुंडले यांनी मानले.कार्यक्रमाच्मा यशस्वीतेसाठी ललिता डेकाटे,नीता मोटघरे,हर्षा तलवारे,अरुणा कांबळे, भावना निमजे,अर्चना दळवे,संगीता ढेंगरे, प्रतिभा रामटेके,भारती बोरकर तथा शालेय विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!