कर्मवीर छात्रालयात डॉ. आंबेडकर जयंती साजरी

 

शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचालीत कर्मवीर छात्रालय मूल च्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचे जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी छात्रालयाचे अधिक्षक प्रमोद आत्राम होते.

यावेळी पाहुण्यांनी व विद्यार्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचे प्रतिमेस माल्यार्पण करून, मेणबत्ती प्रज्वलीत करून कार्यक्रमास सुरूवात केली. यावेळी विद्यार्थानी डॉ. बाबासाहेबांचे जीवनावर प्रकाश टाकणारे भाषण केले, गाणी सादर केली.

छात्रालयाचे अधिक्षक प्रमोद आत्राम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांचे आदर्श ठेवून आपले जीवन अधिक समृध्द करावे असे विद्यार्थाना आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!