ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी अवैधरित्या रेतीने भरलेला विना नंबरचा ट्रॅक्टर पकडून केली जप्तीची कारवाई
नेरी येथील रेती तस्कर संदीप पिसे यांचे ट्रॅक्टर केले तहसील ला जप्त
पहाटे ३ वाजता दरम्यानची घटना
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात रेती माफियांना पकडण्यासाठी महसूल विभागाने कंबर कसली असून महसूल विभागाच्या भरारी पथकाने दिनांक. १२ एप्रिलच्या पहाटे ०३:०० वाजता च्या दरम्यान गोरवड - मोटेगाव मार्गावर अवैधरित्या रेतीने भरलेला ट्रॅक्टर पकडून जप्तीची कारवाई करीत पंचनामा करून महसूल विभागाच्या तहसील कार्यालयात जमा करीत नेरी येथील रेती तस्कराच्या मुसक्या आवळल्या असून सदर ट्रॅक्टर नेरी येथील संदीप पिसे यांच्या मालकीचे आहे. तर हे ट्रॅक्टर विना नंबरचे असल्याने मोठी कारवाई होणार असल्याची चर्चा देखिल रंगली आहे. हि कारवाई पहिलीच नसून नेरी जवळील गोरवड घाटावर मोठया प्रमाणात मुबलक सुबक बांधकाम करण्यासाठी मोठया प्रमाणात पांढरी शुभ्र रेती उपलब्ध आहे. या घाटावर रेती तस्करांचा डोळा असून या घाटावरून मोठया प्रमाणात रेती चोरून तस्करांनी आपले उखळ पांढरे केले आहे. मात्र महसूल विभाग उशिरा कारवाई करण्यात गुंतला आहे. ११ तारखेला रात्री गुप्त माहितीच्या आधारे गोरवड मोटेगाव मार्गावर गस्त लावली असता पहाटे ३ वाजता च्या दरम्यान संदीप पिसे यांचे ट्रॅक्टर आले असता त्याला रंगेहाथ पकडण्यात ग्राम महसूल अधिकारी यांना यश प्राप्त केले.अनेकदा सदर ट्रॅक्टर महसूल विभागाच्या हुलकावण्या देण्यात पटाईत होता मात्र शेवटी तो महसूल विभागाला गवसला त्यामुळे सदर ट्रॅक्टर मालकावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. या कारवाईचे सर्वच स्तरावरून ग्राम महसूल विभागाचे अभिनंदन केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!