"ती "अट रद्द करा अन्यथा गावाकऱ्याच्या वतीने झुनाबाई कुटीवर आंदोलन करणार


मदनापूर येथील महिलाचा वनविभागाला आक्रमक इशारा

प्रकल्प संचालक साहेब आपण गप्प का ? 

पर्यटन बंदचा आजचा सहावा दिवस

उप संपादक
विलास मोहिणकर
 
चंद्रपूर : -  चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात जागतिक स्तरावर नावलौकिक असलेल्या ताडोबा बफर झोन अंतर्गत मदनापूर येथे मागील पाच दिवसा पासून वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम यांनी टाकलेल्या जाचक अटीमुळे गावातील महिला व पुरुष आक्रमक होत मदनापूर वरून सफारी पर्यटन गेट बंद करण्यात आला आहे. सदर अटी व शर्ती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी स्वतः लावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गेल्या पाच दिवसापासून कंपीग स्वयंपाक गृह बंद आहे. मदनापूर पर्यटन गेट पण बंद करण्यात आला आहे. मात्र पर्यटकांना कोलारा गेट वरून सफारी मदनापूर च्या जंगलात करण्यात येत आहे. त्यामुळे वनविभागाला नफा होत आहे मात्र बिचाऱ्या गरीब महिलांचे नुकसान होत आहे.वनविभाग यासाठी नामी शक्कल लढवत वनविभागाला मिळणारे पर्यटन रक्कम आणि स्थानिक मालकाच्या जीप्सी चालक व गाईड यांना कोलारा या गेट वरून सफारीचा मार्ग मोकळा करून दिला आहे. यातून गाईड जिप्सी चालक मालक यांना नफा मिळत आहे. मात्र स्थानिक गरीब आदिवासी महिलांनाची बचत गटाची वनपरीक्षेत्र अधिकारी कडून जाणीवपूर्वक पिळवणूक केल्या जात आहे.यामुळे संपूर्ण मदनापूर गावकरी वनविभागाविरुद्ध दंड थोपटून उभे झाले आहेत.गेल्या पाच दिवसा पासून बंद असलेल्या मदनापूर गेटकडे प्रकल्प संचालक ताडोबा बफर यांनी लक्ष घालून गावकरी व वनविभागतील स्थानिक अधिकारीचा हेकेखोर पणाची चौकशी करून प्रकरण निकाली काढतील की फक्त आपल्या चुकीच्या अधिकाऱ्याची पाठराखण करतील याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. वनपरीक्षेत्र अधिकारी स्थानिक नागरिकांशी संवाद न करता निगरगट्ट भूमिका घेत आहे. मी गावात येणार नाही तुम्हाला गरज आहे तर तुम्ही माझ्याकडे या मी येणार नाही अशी मी पणाने वागून गावकरी यांना कमी लेखण्याचा प्रकार करीत असल्याची संतप्त भावना दिनांक.१२ एप्रिलला प्रत्यक्ष पत्रकारां समोर गावकरी जनतेने व्यथा मांडली. त्यामुळे शासकीय अधिकारी जनतेच्या सेवेसाठी आहेत की, जनता अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी नियुक्त केले जातात कि काय असा ? निर्माण झाला आहे. या गटातील महिलांची कोणतेही चूक नसतांना विनाकारण अट टाकून महिलांना व गावकरी जनतेला नाहक त्रास देणाऱ्या अधिकारी यांना तात्काळ चौकशी करून प्रकरण निकाली काढावे अन्यथा गावकरी जनतेच्या वतीने मदनापूर जंगलात असलेल्या झुनाबाई कुटीवर जाऊन आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा ईशारा यावेळी गावकरी आणि महिलांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!