सावली तालुक्यात सरपंच पदाचे आरक्षण जाहीर - आरक्षित जागेमुळे कही खुशी कही गम @ थेट होणार सरपंच निवडणूक
सावली - ग्रामपंचायत सन २०२५-२०३० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक सरपंच पदाचे आरक्षण आज तहसील कार्यालयाचे सभागृहात जाहीर करण्यात आले. थेट सरपंच पदाची निवडणूक होणार असल्याने सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ज्या गावात नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण सरपंच आरक्षण आहे तिथे खुशी तर आरक्षण असलेल्या गावात गमचे वातावरण आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ३ वर्षांपासून झालेले नसल्याने तेथील इच्छुक सरपंच पदासाठी दावेदारी करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ च्या नियम २-ज (१) (२) नुसार सन २०२५-२०३० या ५ वर्षाच्या कालावधीसाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्गाचा प्रवर्ग आणि खुला प्रवर्गातील महिलांकरीता शासनाने सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करुन दिलेले आहे. त्यानुसार आज सावली तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीकरीता सरपंच पदाची आरक्षण सोडत सभा तहसीलदार प्रांजली चिरडे यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय सावली येथील सभागृहात पार पडली. अनुसुचित जातीकरीता ६, अनुसुचित जमाती करीता ९, नागरिकांचा मागासप्रवर्गाचा प्रवर्ग करीता १२, सर्वसाधारण प्रवर्गकरिता करीता २७ जागा आरक्षित करण्यात आले.
सर्वसाधारण स्त्री राखीव - चिखली, मुंडाळा, डोंगरगाव, बोरमाळा, खेडी,चांदली, चारगाव, कसरगाव, पालेबारसा, गायडोंगरी, उसरपार तुकूम, कढोली, निलसनी पेठगाव, विहीरगाव
अनुसूचित जाती स्त्री राखीव - अंतरगाव, चिचबोडी, निमगाव
अनुसूचित जमाती स्त्री राखीव - बेलगाव, जिबगाव, व्याहाड बुज, मोखाळा, करोली
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव - पेंढरी मक्ता, सायखेडा, मेहा बुज, जांब बुज, बोथली लोंढोली
अनुसूचित जाती सर्वसाधारण - कवठी, आकापूर, सामदा बुज
अनुसूचित जमाती सर्वसाधारण - पारडी, वाघोली, निफंद्रा, थेरगाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग - गेवरा बुज, पाथरी, डोनाळा, उपरी, व्याहाड खुर्द, उसेगाव,
सर्वसाधारण - चकपीरंजी, नवेगाव तुकूम, हिरापूर, केरोडा, मंगरमेंढा, गेवरा खुर्द, कापसी, घोडेवाही, हरंबा, करगाव, साखरी, कोंडेखल, सोनापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!