अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांची धडक कारवाई

चिमूर पोलीस स्टेशनला ट्रक जप्त 

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यात कुठेही रेती घाट लिलाव झालेले नसून जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रेतीचा उपसा करून नदी पात्राच्या बाजूला रेतीचा साठा रेती माफियाच गोळा करून ठेवीत त्यावर महसूल विभागालाच कारवाई करण्यासाठी सांगितले जाते. कारवाई नंतर त्या रेती साठ्याचा लिलाव केल्या जातो. आणि त्याच रेतीच्या एका रॉयल्टी वर दिवसभर अवैधरित्या नदीपात्रातील जेसीबी व पोकलँड च्या साहाय्याने ट्रॅक्टर तसेच हायवा आणि मोठं - मोठे ट्रक सुद्धा रेतीने भरून जिल्ह्यातच नाही तर विदर्भात सर्वत्र याची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. वाहणावर कारवाई करीत असतांना GPS व बारकोड तपासणे अत्यंत गरजेचे असते तेव्हाच योग्य कि अयोग्य याची खात्री केली जाते. परंतु महसूल विभागाकडे सुसज्य अशी माफियांवर नियंत्रण ठेवणारी कम्पुटर ची व्यवस्था नसल्याने वन व महसूल च्या परिपत्रकाचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. CVTV फुटेज नस्ट केली जाते शासकीय कर्मचारी २४ तास घाटावर उपलब्ध राहात नाहीत पोलीस विभागाच्या उघळ्या डोळ्यासमोर खुलेआम हा रेती चोरीचा प्रकार सुरु असतो हा महसूल विभागाचा आगळा वेगळा उपक्रमच आहे. म्हणून चोर तो चोर वरून शिरजोर अशी म्हण खोटी नसून ते उघड सत्य आहे.दिनांक. २१/०४/२०२५ ला रात्रीच्या सुमारास चिमूर तालुक्यातील जांभूळघाट जवळील पिंपळगाव येथे मोठ्या नामांकित कोट्याधीश MKS कंपनीच्या दोन हायवा वाहणावर तसेच एका पोकलँड मशीनवर अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतूक करतांना गावाकऱ्यांनी हायवा वाहन पकडून भिसी पोलिसांच्या ताब्यात दिले. व दोन्ही हायवा तसेच पोकलँडवर जप्तीची कारवाई करण्यात आली. हि चर्चा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रंगली असून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या घरच्याच कंपनी कडून चोरी आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातच असा चोरटा उपक्रम राबविल्या जात असेल तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याची अपेक्षा तरी जनता कशाप्रकारे बाळगेल अशी जनतेत ठिक - ठिकाणी चर्चा असल्याने दिनांक.२२/०४/२०२५ ला चिमूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी हे ॲक्शन मोडवर आले. म्हणून चिमूर शहरात कांपा जाणाऱ्या मार्गावर अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकला सिनेस्टाईल पाठलाग करीत उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी रात्री १० ते ११ वाजताच्या सुमारास पकडून चिमूर पोलीस स्टेशनला ट्रक लावून ट्रकवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून ट्रक क्रमांक.MH 40 CT 4446 आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या माध्यमातून सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!