आंबेनेरी ग्राम पंचायत भष्ठाचाराच्या खोऱ्यात

गावातील मजुरांची मजुरी देण्यात न आल्याने महीला मजुरांनी चक्क ग्राम पंचायत समोरचे गट्टू काढले

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - चिमूर तालूक्यातील मौजा आंबेनेरी ग्राम पंचायत येथे आज दि.23/04/2025 ला सकाळ ला महीला मजुर आल्या आमची मजुरी (मस्टूर) मिळाले नाही म्हणून ग्राम पंचायत समोर चे गट्टू काढायला सुरवात केली.ही घटना बघून सरपंच भिसी पोलीस स्टेशला तक्रार देण्यासाठी गेले पण सध्या तक्रार देण्यात आली नाही.अश्या प्रकारची माहीती नागरीका कडून मिळत आहे. बरेश्या महीला व पुरूष मजुरानी सरपंच व ग्राम पंचायत ला घेरावा केला होता. 70 ते 80 मजुर लोकांची मजुरी (मस्टूर) देण्यात आली नाही. त्यामुळे मजुर वर्गाचा संताप सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ठेकेदार व रोजगार सेवकावर केला जात आहे.अशा प्रकारे बरेश्या प्रमाणात मस्टूर उचलण्यात आले आहे.या मस्टूरांची मजुरी मजुरा पर्यंत आली नाही. सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार,रोजगार सेवक यांच्या मध्ये भष्ठाचार झाल्याचा आरोप मजुर वर्ग व गावकरी करीत आहे.आमची मजुरी मिळाली नाही तर ग्राम पंचायत ला ताला ठोकण्याचा ईशारा मजुर वर्गानी केला आहे.या सर्व प्रकारची चौकसी पंचायत समीतीच्या बी.डी.ओ. कडून करण्यात यावी.अशी मागणी मजुर वर्ग व गावकऱ्या कडून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!