अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना नामांकित MKS कंपनीचे दोन हायवा आणि एक पोकलँड मशीन जप्त
आमदार सुधीर मुनगंटीवारांची घेतली गावाकऱ्यांनी दखल
भिसी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना
महसूल अधिकारी नॉट रिचेबल
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक.२१/०४/२०२४ ला चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येत असलेल्या जांभूळघाट जवळील पिंपळगाव येथे स्थानिक गावाकऱ्यांनी मिळून अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना नामांकित (MKS) कंपनीचे २ हायवा आणि १ पोकलँड मशीन पकडून भिसी पोलिसांच्या ताब्यात दिले. हि घटना रात्री ८ ते ९ वाजताची असून कोटगाव ते पिंपळगाव ला जाणाऱ्या नदी पाठातील रेती हि अवैधरित्या पोकलँड मशीन च्या साहाय्याने हायवा मध्ये भरून वाहतूक करीत असतांना गावाकऱ्यांनी व पोलीस पाटील माधव भदुजी झाडे यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.रेतीने भरलेली दोन्ही हायवा वाहन भिसी पोलीस स्टेशन ला जप्त केली असून पोकलँड मशीन हि घटनास्थळीच आहे. वाहतुकीचे साधन उपलब्ध नसल्याने त्यावर सुद्धा जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सकाळी ट्रेलर च्या साहाय्याने पोलीस स्टेशन भिसी ला पोकलँड मशीन लावण्यात येणार असल्याची माहिती भिसी पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. हे दोन्ही हायवा व पोकलँड मशीन नामांकित कोट्याधीश असलेल्या पुढऱ्यांची आहे.यांचेवर थातूर - मातूर कारवाई न करता कडक कारवाई व्हायला हवी अशी गावाकऱ्यांची मागणी आहे. आताच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशनात केलेल्या मांडणी नुसार गावाकऱ्यांनी केलेल्या कामगिरीचे महसूल अधिकाऱ्यांकडून स्वागत केल्या जाईल काय? अशी गावाकऱ्यांना आस लागलेली आहे.ठराविक कालावधीतच महसूलचे भरारी पथक माफियांवर कारवाई करीत असतात मग पुन्हा परिस्थिती तेच असते.अशी जिल्ह्यात सर्वत्र चर्चा बघावयास मिळत असते व योग्य वेळी महसूल अधिकारी फोन उचलत नसून गावाकऱ्यांना याची खंत वाटत आहे. याकडे सुद्धा जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!