मानोरा ग्रामपंचायत चे सचिव यांना आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - भद्रावती तालुक्यातील येत असलेल्या मानोरा, आष्टा, कोकेवाडा तुकुम,ग्रामपंचायतचे सचिव भरत अंबादास राठोड यांना आदर्श ग्राम पंचायत पुरस्कार देण्यात आला.पंचायत राज दिन 2025/26 सरपंच / सदस्य मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन जे.के. कॉम्प्लेक्स चंद्रनखेडा रोड भद्रावती या ठिकाणी करण्यात आले होते, राष्ट्रीय पंचायत राज दिन सन 2020-21 चा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार भरत अंबादास राठोड ग्रामपंचायत मानोरा सि यांना वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र आमदार करण संजय देवतळे तसेच गिरीश धायगुडे, सामान्य प्रशासन ज़िल्हा परिषद चंद्रपूर गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांचे हस्ते सदर पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला पंचायत समिती भद्रावती अंतर्गत 70 ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,तालुक्यातील नागरिक यांच्या उपस्थित पुरस्कार देण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!