उन्हाळ्यात आरोचे थंड पाणी, शुद्ध नागरिकांना मिळते का?
जार, बाटली बंदच्या जमान्यात पाणपोई गायब
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा सहीत परिसरात मोठ्या प्रमाणात थंड पाण्याचे व्यवसाय सुरू असून खरंच थंड केलेले पाणी शुद्ध पिण्यासाठी नागरिकांना मिळते का असा प्रश्न आता उपस्थित होते पूर्वी उन्हाळा आला की तहानलेल्यांची तहान भागविण्यास सामाजिक कार्याची भान ठेवत सामाजिक संस्था व दानशूर व्यक्ती स्वखर्चाने पाणपोई सुरू करत होते परंतु अलीकडच्या काळामध्ये पाण्याचा व्यापार सुरू झाल्याने सर्वत्र जार व पाणी बॉटल्स विकल्या जात आहेत पाणपोई गायब होत चालल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.वरोरामध्ये थंड पाणी आरोची व्यवसाय करणारे नागरिक आहे त्यातच ठिकठिकाणी दुकानदार आपल्या दुकानांमध्ये 20 ते 30 रुपयाची थंड कॅन घेऊन येणाऱ्या ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देत आहे, हे पाणी खरंच पिण्यासाठी शुद्ध आहे का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे तहानलेल्यांना पाणी पाजणे ही आपली संस्कृती आहे त्यामुळे पूर्वीच्या काळी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संस्था, संघटना सामाजिक सेवेचे भान जपत वाटसरूंना प्यायचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी बसस्थानक, शासकीय कार्यालय, रेल्वे टेशन, तसेच रहदारीच्या रस्त्यावर, आठवडी बाजारात आदी ठिकाणी पाणपोई उभारत त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची गरीब कष्टकरी यांच्यासाठी पाणपोईने चांगली सोय होत होती उन्हाळ्यात यावर भर दिला जाते कारण तेव्हा जारचे प्लांट, बाटलीबंद पाण्याचा व्यापार फारसा विस्तारला नव्हता अलीकडे मात्र जारच्या माध्यमातून पाणी विकत व सवलतीच्या दरात मिळू लागल्याने पाणपोईची पद्धत मागे पडू लागली आहे. हॉटेलमध्ये बाटली बंद 10 ते 20 रूपये पाणी विकत घेऊन पिणाऱ्यांची संख्या जास्त वाढली आहे परंतु ज्यांना बाटलीबंद पाणी विकत घेणे शक्य नाही, प्रवासात जार घेणे शक्य नाही, अशा गोरगरीब, सामान्यांचे उन्हाळ्यात हाल होत आहेत त्यामुळे विविध मंडळे दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेऊन पाणपोई पुन्हा सुरू करून तहानलेल्यांना पाणी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.पूर्वीच्या काळी घराबाहेर पडल्यानंतर कुठे रांजण, माठ, त्यावर लाकडी झाकणी, लाल रंगाचा ओला कपडा झाकलेले पाणी पिण्यासाठी रंगीबेरंगी प्लास्टिकचे ग्लास अशी पाणपोई असायची, त्या रांजणांमधील नैसर्गिक पद्धतीने थंड झालेले पाणी पिले की तहान भागायची; परंतु कालांतराने संकल्प बदलले, पाणपोईची जागा थंड पाण्याच्या जारने घेतली. जारमुळे मातीच्या माठांचा, रांजणचा वापर कमी झाला.दुकानात मिळणाऱ्या बाटली बंद व कॅनच्या पाण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाचे परवाना आवश्यक आहे, आजही परवाना न काढता काही उद्योजक वरोरा सहीत ग्रामीण भागात पाण्याच्या धंदा करताना आढळून येत आहे याबाबत अन् औषधी प्रशासन विभाग उदासीन दिसत असून उन्हाळ्यात होत असलेल्या लग्न समारंभामध्ये कॅनचे थंड पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात वापरले जाते त्यामुळे अनेकांना आरोग्याला धोका निर्माण पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या विभागांने यांच्या परवाना तपासणी गरजेचे आहे तसेच त्या पाण्यातील विविध घटकांची तपासणी ही आवश्यक आहे तालुक्यातील ठीक ठिकाणी पाणी थंड करून विकल्या जात असून त्यात कोणते घटक आहे, कोणती घटक नाही याबद्दल ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना माहिती नसते हे पाणी आरोग्यात घातक आहे का? याची तपासणी करणे आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!