चिमूर तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांचा रेती चोरीचा चोरटा उपक्रम सुरूच

अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाची धडक कारवाई

चिमूर तहसील ला दोन्ही ट्रॅक्टर जप्त

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात अवैधरित्या रेतीची वाहतूक मोठ्या जोमाने सुरू असून यावर कुठेतरी अंकुश लावण्यासाठी महसूल विभागाने तालुक्यात फिरते पथक तयार करून रेती चोरट्या माफियांवर धडक कारवाई मोहिम राबविणे सुरु केली आहे. दिनांक.०४/०४/२०२५ ला  अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना विना नंबरचे ट्रॅक्टर ट्रॉली मुंड्यासह पकडली असून या ट्रॅक्टर मालकाचे नाव राकेश उर्फ धम्मा दशरथ भोयर राहणार वडाळा पैकू चिमूर या नावाने प्रसिद्ध आहे.तर वाहन चालकाचे नाव सुनिल गंगाधर कुळमेथे पिंपळनेरी येथील राहिवासी आहे.हि कारवाई आज पहाटे रात्रीच्या अंधारात वेळ ०३:१५ वाजताच्या सुमारास उप जिल्हा रुग्णालय जवळील वाटर फिल्टर प्लॅन्ट ला लागूनच असलेल्या उमा नदी पात्रातील बंधाऱ्या जवळील केशव धारणे यांच्या शेतातच हि कारवाई करण्यात आली.तसेच दुसऱ्या ट्रॅक्टरवर सुद्धा सकाळी वेळ ०६:४४ वाजताच्या सुमारास मानेमोहाळी ते नदी घाट पांदन रस्त्यावर रेतीने भरलेला एम एच ३४ ए बी २५८८ या क्रमांकाची ट्रॅक्टर ट्रॉली व विना नंबरचा मुंडा महसूल विभागाचे फिरते पथकाने पकडले असून या वाहन मालकाचे नाव आसिफ शेख राहणार मासळ तर वाहन चालकाचे नाव सुधाकर धारणे राहणार मासळ येथील राहिवासी आहे.हि संपूर्ण कारवाई चिमूर तहसीलचे तहसीलदार श्रीधर राजमाने यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार निकूरे तर मंडळ अधिकारी पाचभाई व तलाठी प्रसाद घोडघासे, संदिप मुंदे,वैभव कल्याणकर , चंद्रकांत ठाकरे आदींनी मिळून केली.हे दोन्ही ट्रॅक्टर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची असून आमदारांच्या अगदी जवळचे आहे.तर नेहिमीच रेती चोरीच्या कारवाईत यांचा प्रथम क्रमांक लागतो अशीही तालुक्यात चर्चा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!