चिमुर तालूक्यामध्ये पांदन रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर भष्ठाचार
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकसी करावी ग्रामस्थांची मागणी
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - चिमूर तालूक्यातील अनेक पांदन रस्त्याचे काम करण्यात आले आहेत.त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भष्ठाचार झाल्याचे चित्र उघड दिसुन येत आहे.त्यात मौजा जांभुळघाट येथील किसन कामडी यांच्या शेतापासून ते उमरी बुट्टी पर्यंत व माहादेव मसराम ते चिंधी मारोती निंबाळा चे रस्त्या चे काम इस्टीमेंटनुसार करण्यात आले नाही. या पादंन रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भष्ठाचार झालेले आहे. या कामासाठी वापरण्यात आलेले मटेरिअल गिट्टी,मुरूम,घोटाई इत्यादीचा वापर इस्टीमेंट नुसार कंत्राटदारा कडून करण्यात आलेला नाही.या रस्त्याच्या कामाची चौकसी वरिष्ठ अधिकारी तथा अभियांता यांचे कडून करण्यात यावी.अशी मागणी गावातील नागरीकां कडून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!