गोसेखुर्दचे पाणी सोडण्यात यावे व इतर मागण्यांसाठी सरपंच संघटनेचा पुढाकार - मुख्यमंत्री यांना पाठवले निवेदन
सावली - वैनगंगा नदी पात्र कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून तात्काळ गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे, घरकुल बांधकासाठी मोफत रेती देण्यात यावी या मागणीचे निवेदन सावली सरपंच संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.
वैनगंगा नदीच्या काठावर सावली तालुक्यातील अनेक गावे आहेत. या नदीवरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नळयोजनेद्वारे केला जातो, मात्र नदी कोरडी पडल्यामुळे पाणी पुरवठा ठप्प झालेला असून पाणी टंचाई निर्माण झालेला आहे. नदी काठावर शेती असून पाणी नसल्यामुळे सिंचणासाठी अडचणी येत आहेत त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे,
शासनाने घरकुल करीता पाच ब्रास रेती देण्याचे आश्वासन दिले मात्र अंमलबजावणी झालेली नाही. पंतप्रधान आवास घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना,रमाई घरकुल आवास योजना,शबरी आवास घरकुल योजना, अहिल्याबाई होळकर आवास घरकुल योजनेमधून घरकुल मंजूर करण्यात आले परंतु घरकुल लाभार्थ्यांना बांधकाम करीता मोफत रेती उपलब्ध केले नसल्याने बेभाव किंमतीने रेती खरेदी करून बांधकाम करावे लागत आहे. त्यामुळे या प्रमुख मागण्या घेऊन सावली तालुका सरपंच संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व जिल्हाधिकारी यांना तहसीलदार यांच्या माध्यमातून निवेदन पाठविण्यात आले. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम चुधरी, सरपंच कविंद्र लाकडे, विठ्ठल येगावार, सुनिताताई उरकुडे, प्रीतीताई गोहने, ज्योतीताई बहिरवार, रेखाताई बानबले, उष्टु पेंदोर, उषाताई गेडाम, जयश्री मशाखेत्री, उपसरपंच जितेंद्र सोनटक्के, ओमप्रकाश ढोलने, अनिल मशाखेत्री उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!