एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत वैनगंगा विद्यालयाचे सुयश
निकुंज मानापुरे जिल्ह्यातून प्रथम
तर आयुष तिघरे जिल्ह्यातून याने पटकवीला आठवा क्रमांक
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दिनांक.२ एप्रिल २०२५ राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय शिष्यवृत्ती परीक्षेत वैनगंगा विद्यालय पवनीचा निकुंज मानापुरे जिल्ह्यातून प्रथम तर आयुष तिघरे हा विद्यार्थी जिल्ह्यातून आठवा आलेला आहे. एकूण ५२ विद्यार्थ्यांपैकी १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक व ज्येष्ठ शिक्षक संजय लेदे यांचे वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेशजी तर्वेकर साहेब संचालिका भावनाताई तर्वेकर मॅडम सचिव विनोदजी मेंढे प्राचार्य पराग टेंभेकर सर उप मुख्याध्यापक अजय ठवरे सर, पर्यवेक्षक प्रमोद मेश्राम सर, पर्यवेक्षक विकास रिनके सर, ज्येष्ठ शिक्षक अविनाश नरहरशेट्टीवार सर तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!