वाघाच्या हल्यात मोहफुल गोळा करणार्या ईसमाचा मृत्यू
तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील गंगासागर हेटी येथील घटना
तालुका - प्रतिनिधी ( यश कायरकर )
नागभीड : - ब्रम्हपुरी वन विभाग अंतर्गत येणाऱ्या तळोदी बाळापुर वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गंगासागर हेटी येथील मारोती सखाराम बोरकर (वय ६०) हे आज सकाळी 8 वाजे मोहफुल गोळा करण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेले असता. परिसरातील वावरनार्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.संबंधित घटनेची माहिती मिळतात तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार व त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली व मोक्याच्या पंचनामा करून शव विच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पाठविण्यात आले. मृत्तकाचे परिवाराला तात्काळ आर्थिक मदत करण्यात आली. परिसरातील लोकांना वन उपज संकलन करण्याकरिता जंगलात एकदम सकाळी व आतपर्यंत एकट्याने न जाण्याचे व सावधानता बाळगण्याचे सुचना तळोधी बा.चे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार यांनी दिल्या.घटनास्थळी वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याकरता कॅमेरे लावण्यात आले आहेत. 'तळोदी वनविभागाचे गस्ती पथक सातत्याने परिसरात गस्त घालीत आहेत व वारंवार सावधानतेचा इशारा देत आहेत मात्र याकडे दुर्लक्ष करून वन उपज गोळा करताना वाघाचे वास्तव्य असलेल्या ठिकाणापर्यंत एकट्याने न जाता लोकांनी दक्षता बाळगायला हवी जेणेकरून कुणाचीही जिवीत हानी होणार नाही.' - यश कायरकर , अध्यक्ष, 'स्वाब फाऊंडेशन'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!