खाऊचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

चिमूर येथील घटना

शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )

चिमूर : -  चिमूर शहरातील इंदिरा नगर (बेघर) येथे राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली.चिमूर येथील एकाच वार्डात राहणाऱ्या नराधमाने दोन अल्पवयीन मुलींना अंगणात खेळत असतांना खाऊचे आमिष दाखवले व नराधमाने स्वतःच्या घरी नेऊन लैंगीक अत्याचार केला.याबाबत चिमूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपीचे नाव रसिद रुस्तुम शेख व नसिर वजिर शेख असे आहे दोघेही राहणार चिमूर येथील रहिवासी असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.पोलीस स्टेशन चिमूर येथे नागरिकांनी जमाव करून  आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.यावेळी नागरिकांमध्ये व पोलीसांमध्ये बाचाबाची होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले व पोलीसांनी तानावाच्या वातावरनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लाठीमार करावा लागला यात एक चालक महिला पोलीस जखमी झाली असून जमावातील काही नागरिक सुद्धा गंभीर जखमी झाले आहे. तर दोन ते तीन जणांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.चिमूर शहरात शांतमय वातावरण असून जागोजागी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!