आगीत जळालेल्या घरांसाठी मदत करायला सरसावला एक हात मदतीचा ग्रुप

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - पवनी तालुक्यातील शिवनाळा येथे दिनांक 13/04/2025 ला श्रावण नथू इटानकर, मारुती नथू इटानकर ,रहीनाबाई रामचंद्र इटानकर यांच्या घराला अचानक आग लागली आगीत घर व घरातील संपूर्ण सामान पूर्ण जळून खाक झाले ही माहिती विकास सावरबांधे यांनी किशोर पांचभाई यांना फोनवर कळवले व आग विजवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या गाडीची मागणी केली तेव्हा किशोर पाचभाई यांनी पवनी नगरपरिषद ची फायर ब्रिगेड ची गाडी शिवनाळा येथील घटनास्थळावर पाठवली अग्निशामक दलाच्या गाडीने आगीवर नियंत्रण करण्यात आले. परंतु तोपर्यंत तीन्ही घर जळून खाक झाले होते. घटनास्थळ पाहण्याकरिता पवनी तालुका येथील पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत पीसे लोकमत पत्रकार हरिश्चंद्र भाजीपाले, नवभारत प्रतिनिधी लियाकत अली, साप्ताहिक बर्फातील ज्वाला चे संपादक मनोहर जी मेश्राम नवरास्ट्र चे प्रतिनिधी राऊत असा पत्रकार संच घटनास्थळी पोहोचला या सोबतच घटनास्थळावर ग्राम पंचायत चे सरपंच सुभाषजी खंदाडे , विकासजी सावरबांधे , उपसरपंच द्रोणाचार्य बावनकर, पोलीस पाटील शुभम देशमुख, मंगेश कोसेकर, मंडळ अधिकारी बोरकर,तलाठी ठाकरे व ईतर गावकरी मंडळी घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी सर्व पोचताच जळालेल्या घराकडे पाहत त्या विषयावर चर्चा करण्यात आली.शासकीय यंत्रणेतून तहसीलदार यांनी पवनी पंचायत समिती चे बीडिओ यांच्या सोबत बोलुन नवीन घर बांधकाम करण्यासाठी प्रयत्न करणे व प्रयत्न निष्फळ झाल्यास एक हात मदतीचा उपक्रमातून घर बांधून देऊ असा सांगत पीडित परिवांचा सांत्वन करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!