चिमूर तालुक्यात अवैधरित्या रेतीचे ट्रॅक्टर सुरूच
महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमुर : - चिमूर तालूक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरूच असल्याचे चित्र दैनंदिन दिसुन येत आहे.सावरगाव,मालेवाडा कडून जांभुळघाट कडे सकाळला अवैध रेतीचे ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात सुरू आहे.महसुल विभाग कडून यांच्या कडे लक्ष कसे का देत नाही? चिमुर तालूक्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करांची संख्या असल्याने संपुर्ण तालूक्यात अवैधरित्या रेतीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे.मोठ्या रेती तस्कराकडे पाच ते दहा ट्रॅक्टर उपल्बध असल्याने एका ट्रॅक्टरा वर कार्यवाही झाली तरी इतर ट्रॅक्टरानी रेती तस्करी करीत असतात.महसुल विभागा कडून काही अवैधरित्या रेती चोरीच्या व वाहतुकीच्या ठिकाणी नाल्या खोदून रस्ते अडवण्यात आले पण चोरांना दहा रस्ते असतात. महसुल पथक शांत असल्याने किंवा काही अधिकारी व कर्मचाऱ्या बरोबर रेती तस्करांची सेटींग असल्याने अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे.त्यामुळे तस्करांची हिम्मत वाढत असल्याचे दिसुन येत आहे.अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांवर महसुल विभागा कडून कारवाई करण्यात यावी.अशी जनते कडून मागणी होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!