निरोप समारंभ व वर्गखोली लोकार्पण सोहळा;
तालूका - प्रतिनिधी ( यश कायरकर )
नागभीड : - तळोधी (बा.) पंचायत समिती नागभिड अतंर्गत जनकापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची नविन वर्गखोलीचा लोकार्पण सोहळा तथा वर्ग ७ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा समितीचे उपाध्यक्ष देवता सुर्यवंशी तर उद्घाटक सरपंच वैशाली गायधने ह्या होत्या. यावेळी आयोजीत कार्यक्रमाला उपसरपंच महेश रामटेके, पत्रकार राहुल रामटेके, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी मसराम, कंत्राटदार प्रमोद जुगनाके, संगणक ऑपरेटर ज्ञानेश्वर पडोळे, शाळा समितीचे आशिष गणविर, चंद्रशेखर अलोने, इंद्रजित गावतुरे, रिना मेश्राम, पोलिस पाटील प्रितम मेश्राम, भरडकर, अंगणवाडी सेविका बेबिबाई बोरकर, अश्विनी पडोळे, आशावर्कर दिक्षा मेश्राम, मुख्याध्यापक कामडी, राजकुमार पाटील, दिवाकर सोनुले, शितल माटे, झगेकार, ढोरे, शुभ्रद्रा पडोळे, यांचे उपस्थित कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सोनुले यांनी केले. तर आभार प्रदर्शन पाटील यांनी केले. यावेळी गावातील नागरिक, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!