रानडूकराच्या हल्यात बकरी चारनारा गंभीर जखमी

प्रथमोपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय चिमूर येथे दाखल

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - चिमूर तालूक्यातील मौजा पारडपार येथील सदाशिव उपासराव वल्के वय अंदाजे 60 वर्ष हा दिनांक.20 एप्रिल ला सकाळी शेतामध्ये बकऱ्या चारीत असता दबा धरून बसलेल्या रानटी डूकराने अचानक हल्ला केला व थोडक्यात बचावले गेले.आजू - बाजुच्या लोकानी आरडा-ओरड केल्याने डूक्कर पळून गेला पण त्या रानडूकराने बकऱ्या चारणाऱ्या व्यक्तीला गंभीर जखमी केल्याने त्यांना तात्काळ प्रथमोपचारासाठी चिमुर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.वनविभागा कडून चौकसी करून तात्काल आर्थिक मदत करण्यात यावी.अशी मागणी गावकऱ्या कडून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!