महसूल विभागची रेती तस्करांवर धडक कारवाई

२७ लाख १३ हजार ७०० रुपयाचा दंड वसूल

अवैध रेती तस्करीला बसणार चाप

उप संपादक 
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - भद्रावती तालुक्यात अवैधरित्या रेती तस्करीचे प्रमाण वाढले असतांना या प्रकाराला आळा घालण्यासाठी भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर यांनी कठोर पाऊले उचलली असून तीन महिन्यांत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या २७ वाहणांवर कारवाई करून त्यापैकी २१ वाहण मालका कडून २७ लाख १३ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल केला असून ६ वाहन मालकांकडून दंड वसूलीची प्रक्रीया सुरू आहे.
      रेती तस्करी करणाऱ्या वाहन चालकांकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये मोठे हायवा ट्रक आणि ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. हे सर्व वाहन धारक रात्रीचा वेळी छुप्या मार्गाने पिपरी, कोंढा नाला, बिजोनी आणि ईतरत्र अशा अनेक ठिकाणी रेती उपलब्ध असलेल्या नाल्यातून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रेती तस्करी करीत असतात. गावामधून जाणाऱ्या रेतीच्या वाहणांच्या मोठ्या कर्कश अशा आवाजाने काम धंदे करून थकून भागून आलेल्या नागरीकांची रात्रीची झोप मोढ होत होती. या अवजड वाहणांनी चांगले रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तहसीलदारांच्या या कारवाई मुळे रेती चोरट्यांचे नवीन तंत्रज्ञान मोडीत काढीत शासनाला महसूल मिळवून दिला. 
       परंतू तहसीलदारांच्या अशा अनेक कारवाई मुळे रेती माफीयांचे धाबे दानाणले असून ते आता तहसिल प्रशासनावर खोटे- नाटे आरोप करीत आता तहसिल कार्यालयाची बदानामी करण्याची या चोरट्यांनी नवीन शक्कल लढविली आहे.
     मात्र तहसीलदार भांडारकर यांनी आपला कर्तव्य कठोर पणा असाच कायम ठेवावा अशी जन मानसात प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!