हर्षल वाहने यांच्या जन्मदिवसा निमित्त अपना घर वृद्धाश्रमात फळ वाटप करून दिली कूलरची भेट
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.२१/०४/२०२५ ला सामाजिक कार्यकर्ते शामराव वाहने यांचे चिरंजीव हर्षल वाहने यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत एक प्रेरणादायी कार्य केले.त्यांनी शहरातील अपना घर वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांना फळे आणि थंड हवा देणारा कूलर भेट म्हणून दिला.आज सकाळी वाहने परिवार यांनी वृद्धाश्रमात जाऊन तेथील आजी-आजोबांना विविध प्रकारची ताजी फळे यांचे सुद्धा वाटप केली.तसेच वाढत्या उन्हाळ्याचा विचार करून त्यांनी वृद्धाश्रमातील लोकांना उष्णतेपासून आराम मिळावा यासाठी एक नवीन कूलर देखील संस्थेला प्रदान केला.याप्रसंगी बोलताना शामराव वाहने म्हणाले, "आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेण्यातच खरी खुशी आहे.या वृद्धाश्रमातील लोकांचे आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि मला आनंद आहे की माझ्या मुलाच्या जन्मदिवसा निमित्त मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकलो." अपना घर वृद्धाश्रमाच्या संचालकांनी वाहने यांच्या या संवेदनशीलतेचे कौतुक केले.आणि त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, शामराव वाहने यांनी दिलेली फळे आणि कूलर आमच्या आजी-आजोबांसाठी खूप उपयुक्त ठरतील.त्यांच्या या प्रेमाळ भेटीमुळे येथील वातावरण अधिक सकारात्मक झाले आहे."
शामराव वाहने यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांच्या या उदाहरणातून इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि समाजातील गरजू लोकांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी शामराव वाहने,वंदना वाहने,मयुरी वाहने,जनार्दन वाहने, देवराम वाहने,भीमराव वाहने,निशांत वाहने,अश्विनी वाहने, प्रदीप बौद्ध उषा वाहने मंदा वाहने,दर्शना बौद्ध, प्रणय वाहने,सुजल वाहने, रुपेश नंदागवळी,अंजिरा नंदागवळी, रुचिता वाहने, संदिप वाहने,प्राची वाहने, रिंकु वाहने,राणी वाहने,सावी बौद्ध,गार्वी वाहने,मुख्याध्यापक राकेश बिसने,राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!