सावली तालुका क्रिडांगणासाठी जागा देण्याची मागणी - जागा न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा सावलीकरांचा इशारा
सावली :सावली नगरपंचायत हद्दीतील योगी नारायण बाबा मठ परिसरातील खुली जागा सावली तालुका क्रीडांगणा करीता कायमस्वरूपी ठेवण्यात यावी व लगतची जागा सुध्दा क्रीडांगणा करीता देण्यात यावी यासाठी समस्त सावली शहरातील क्रीडाप्रेमी आणि सावलीकरांनी तहसीलदार सावली, मुख्याधिकारी नगरपंचायत सावली, ठाणेदार पोलीस स्टेशन सावली, वनपरीक्षेत्र अधिकारी वनविभाग सावली यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. क्रिडांगणाला जागा न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
योगी नारायण बाबा मठ परिसर ( सर्व्हे नंबर (७९८) या जागेवर मागील ५ ते ६ वर्षापासून अनेक खेळाडू स्पर्धक इथे सराव करतात, सावली नगरपंचायत आणि सावली मित्रपरिवारा तर्फे विविध खेळाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन याच मैदानावर करण्यात आले. या मैदानाच्या माध्यमातून युवा वर्गाने पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले आहे या मैदानावर अनेक विद्यार्थी शारीरिक चाचणीची तयारी करून अनेक ठिकाणी नोकरी करीत आहेत सुशिक्षित बेरोजगार तरुण, तरुणी याच मैदानावर सराव करतात म्हणून ही जागा सावली शहरात क्रीडांगणासाठी मिळावी असं सावलीतील क्रीडाप्रेमी आणि सावलीकरांना वाटते. नगरात क्रीडांगण व्हावे म्हणून ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी १२. ५० कोटी रुपये मंजूर केले, काही दिवसात कामाचे निविदा काढण्यात येणार. सावलीतील युवा वर्गाचा अधिकारी होण्याचे स्वप्नास कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून या क्रीडांगणाची गरज आवश्यकता आहे ही सावलीवासीय जनतेची मागणी आहे. निवेदन तहसीलदार सावली यांचे मार्फत मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविण्यात आले सदर निवेदनाचा आर्त विचार करून सावली नगरपंचायत हद्दीतील क्रीडांगणासाठी योगी नारायण बाबा मठ परिसर लगतची (सर्व्हे नंबर ७९८) ही नियोजित जागा कुणालाही न देता ती कायमस्वरूपी क्रीडांगणासाठी राखीव ठेवण्यात यावी अन्यथा सावलीवासीय जनते तर्फे उग्र आंदोलन करण्याचा इशारा सावलीकरांनी दिला.
निवेदन देतांना नगरपंचायत सावली चे नगराध्यक्ष लताताई लाकडे, उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार, माजी नगराध्यक्ष विलास यासलवार, नगरसेवक प्रीतम गेडाम, अंतबोध बोरकर, सूरज बोम्मावार, कृष्णा राऊत, विजय कोरेवार, चंद्रकांत गेडाम, राहुल लोडेलिवार, गजेंद्र मानापुरे, अमरदिप कोणपत्तीवार, मयूर व्यास, सचिन जक्कुलवार, नरेश तिग्गलवार, कमलेश गेडाम, प्रमोद डोहने, निखिल दुधे, गब्बर दुधे, टायसन मेश्राम, बाबा मेश्राम, राकेश कोंडबत्तूनवार, अंजली दमके, नगरसेविका ज्योती गेडाम, ज्योती शिंदे, प्रियंका रामटेके, सीमा संतोषवार इत्यादी उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!