आमदारांच्या क्षेत्रातील लाडक्या बहिणीचे बेहाल - मतासाठीच लाडक्या बहिणी होत्या का? असा महिलांचा संतप्त सवाल

 

मुल - इमारत बांधकाम कामगार महिलांसाठी एक रूपया मध्ये पेटी आणि सामान वाटपची तारीखा जाहीर केले. एमआयडीसी चंद्रपूर परिसरात दिनांक १२/३/२०२५ बुधवारला मूल आणि चिमूर अशा दोन तालुक्यातील बहिणींना बोलावून पेट्या वाटपाचा कार्यक्रम प्रकाशीत केले.  तालूक्यातून पाच हजार च्या वर आमदार साहेबांच्या लाडक्या बहिणी उपस्थित होत्या. बहिणीचे मन वळविण्यासाठी पेट्या वाटपाचा कार्यक्रम सुरू केले आणि काम्पूटरचा सर्व्हेअर बंद आहे म्हणून काम्पूटर बंद करून तिथले कर्मचारी निघून गेले आणि लाडक्या बहिणेचे बेहाल झाले. तिथ ना पाण्याची सोय, ना बाथरूम संडास सोय लाडक्या बहिणीना उघड्यावर आपली व्यवस्था थाटावी लागली उपास तापास पोटाशी तीन चार महिण्याचे पोर पोटाशी धरून लखलखत्या उन्हात उभे राहून दिवस घालवे लागत आहे तरी याकडे ज्या पक्षाचे राज्यात मुख्यमंत्री आहेत त्याच पक्षाचे पाच आमदार आमच्या जिल्ह्यात असूनही बहिणींना भटकंती करावी लागत आहे त्यामुळे बहिणी सुद्धा म्हणायला लागल्या आहेत भाऊ कुणा म्हणू  लाडक्या बहिणीच्या मतावर निवडून आलेले आमदारही याकडे दुर्लक्ष केल्याने महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!