वनविभागाच्या चुकीमुळे सावलीत वणवा भडकला - सावली कडकडीत बंद ठेऊन वनविभागावर मोर्चा @ पेसा कायदा लागू होत नसतांना आदिवासी समुदायाला टार्गेटवर आणण्याचे काम वनविभागाचे
सावली - मागील 5 वर्षांपासून नगरपंचायत हद्दीतील संत योगी नारायण बाबा मठ परिसरात असलेली खुली जागा क्रीडांगणा करिता कायमस्वरुपी ठेवण्यात यावी व लगतची वनविभागाची जागा सुद्धा क्रीडांगणा करता देण्यात यावी अशी मागणी करीत असतांना वनविभागाने पेसा कायदा शहरात लागू नसतांना व आदिवासी समुदायाचा विरोध असल्याचे सांगून ठिणगी पेठविल्याचे दिसून येत आहे. यावरून आज वनविभागाचे विरोधात सावली बंद ठेऊन, मोर्चा काढत वणवा भडकल्याचे दिसला.
योगी नारायण बाबा मठ परिसर, लगतची (सर्व्हे न. 798) या वनविभागाच्या जागेवर मागील पाच ते सहा वर्षापासून अनेक खेळाडू, स्पर्धक इथे सराव करतात, सावली नगर पंचायत तसेच सावली मित्रपरिवारातर्फे विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन याच ग्राउंडवर केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले ग्राउंडचा उपयोग करतात, त्यात लहान तरुण व प्रौढ व्यक्ती अनेक खेळाचा उपयोग या ग्राउंडवर करतात करिता या जागेची सावली शहरातील व तालुक्यातील शिकणाऱ्या विद्यार्थी व विध्यार्थीनिंना सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो, या ग्राउंडच्या माध्यमातून युवा वर्गाने अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले आहे, सदर क्रीडांगावरून अनेक विद्यार्थी शारीरिक चाचणीची तयारी करून अनेक ठिकाणी नौकरी करीत आहेत व सुशिक्षित, बेरोजगार, तरुण-तरुणी, याच क्रीडांगनाचा उपयोग करतात. म्हणून हि जागा सावली शहरात क्रीडांगासाठी मिळावी, अशी सावलीवासियांची मागणी आहे.
सावली नगरात क्रिडांगण निर्माण व्हावेत म्हणून आमदार विजय वड्डेटीवार यांनी 12.50 कोटी रुपये मंजूर केले. काही दिवसात कामाचे टेंडर सुद्धा काढण्यासाठी दिले. मागील 4 वर्षांपासून ही जागा क्रिडांगणासाठी नगरपंचायत नी मागणी केलेली आहे. त्याकरिता सर्व सोपस्कर पार पडले मात्र अचानक या जागेबाबत उपवनसंरक्षक चंद्रपूर यांनी पेसा अंतर्गत येत नसतांना व आदिवासी समुदायचा विरोध असल्याचे कारण सांगत ही जागा क्रिडांगणासाठी देण्याचा प्रस्तावच फेटाळून आदिवासी समुदायचे विरोधात ठिणगी पेटविल्याचे दिसून येत आहे. या वनविभागाच्या चुकीमुळे सावलीत आक्रोश निर्माण झालेला असून आज कडकडीत बंद ठेऊन मोर्चा निघाला. ती जागा क्रिडांगणाला न दिल्यास शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!