स्वाब संस्थेने सात बहिणी डोंगर केला प्लास्टिक मुक्त

स्वाब संस्थेने सात बहिणी डोंगर केला प्लास्टिक मुक्त
(स्वाब संस्थेच्या स्वच्छता मोहीम मध्ये दोन ट्रॅक्टर प्लास्टिक कचरा प्लास्टिक बॉटल, पिशव्या व दारूच्या बाटल्या उचलून गड केला स्वच्छ.)
तलोधी(बा.):
        तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील प्रसिद्ध पेर्जागड (सेव्हन सिस्टर हिल) परिसर हा पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी झटनारी 'स्वाब' संस्था गेल्या कित्येक वर्षापासून  परिसरात  'प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियान' राबवून स्वच्छ करीत असते. ही संस्था प्रत्येक महिन्याला  जंगलालगतच्या धार्मिक स्थळी, पर्यटन स्थळी, तलाव, रस्ते, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वन्यजीव व पर्यावरणा करीता हानीकारक प्लास्टिक  कचरा श्रमदानातून गोळा करून त्याच्या योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून संपूर्ण परिसर प्लास्टिक मुक्त  करीत असते.
        विशेष म्हणजे सात बहिणी डोंगर हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ जंगलात असल्यामुळे हजारोंच्या संख्येने येथे पर्यटक पर्यटनाकरिता येत असतात 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि महाशिवरात्रीला तर लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. यावर्षी 26 व 27 फेब्रुवारी ला महाशिवरात्रीच्या निमित्ताने लाखो श्रद्धाळू या मंदिर डोंगरावर जत्रेमध्ये आले होते. डोंगरावर पाणी, शितपेय बाटल्या, विकत मिळत असल्यामुळे पर्यटक तिथेच नशा पानी व मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा करतात. येथे भरलेल्या महाशिवरात्रीच्या या जत्रेमध्ये जाऊन संस्थेच्या वतीने हातात फलक घेऊन दोन दिवस जत्रेमध्ये फिरून पर्यावरण व वन्यजीव करीता घातक 'प्लास्टिक कचरा पर्यावरणात कुठे फेकू नये, प्लास्टिक हटाओ पर्यावरण बचाओ, अशी जत्रेमध्ये जनजागृती केली. व रविवारी 16 मार्च ला सकाळी 6 वाजता मोहीम हाती घेत दिवस भर डोंगर परिसरात सर्वत्र विखरलेला प्लास्टिकच्या परिसरातील कचरा प्लास्टिक पत्रावळी, बाटल्या, दारूच्या बाटल्या, पिशव्या, असा दोन ट्राक्टर ट्राली भरुन, गोळा करून त्याच्या योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून प्लास्टिक मुक्त केला.
     यावेळी या स्वच्छता कार्यात संस्थेचे तळोधी, सावरगाव, सावंगी, किटाळी, मांगरुड, वाढोणा, नागभीड, येथील स्वाब संस्थेचे  स्वच्छता मित्र, यश कायरकर, नितीन भेंडाळे, जिवेश सयाम, जीवन गुरूनुले, अमन करकाळे, कैलास बोरकर, गिरीधर निकूरे, शुभम निकेशर, चिराग सेलोकर, आदित्य नान्हे, गौरव निकुरे, आदित्य आंबोरकर, तर स्वप्निल मेश्राम, अक्षय मेश्राम यांनी  सहकार्य केले.
 यांनी श्रमदानातून ही स्वच्छता मोहीम राबवली. तर  यावेळी वन विभागाचे गोविंदपूरचे क्षेत्र सहाय्यक आर.एस. गायकवाड, गोविंदपूर चे वनरक्षक पी.एम. श्रिरामे, येनूलीच्या वनरक्षक सौ. ए. डी. कर्हाडे, सारंगड चे वनरक्षक बी.व्ही.नन्नावरे, तथा वनमजूर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!