नवरगांवच्या लेकांनी वाजविला विदेशात डंका!

नवरगांवच्या लेकांनी विदेशात वाजविला डंका!



चंद्रपूर जिल्हयातील तुलनेने मागास असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील नवरगांवच्या एका युवकांनी आपली अतुलनीय कामगीरी बजावत विदेशात यशाचा डंका वाजविला आहे. विदेशात भारताचे नाव चमकविणार्या नवरगावच्या या युवकांचे नांवे आयुष असून, तो सिंदेवाही तालुक्यातील चंद्रभूषण उर्फ चंदू जयस्वाल यांचा मुलगा आहे.

आयुष चंद्रभूषण जयस्वाल हा आयमाइल डिलिव्हरी सर्व्हिस एलएलसी दुबई येथे ग्लोबल लॉजिस्टिक्स सप्लाय चेन अकाउंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.   त्यांना अलिकडेच संस्थेच्या यशात आणि वाढीत उल्लेखनीय योगदान दिल्यामुळे iMile Delivery Service LLC कडून प्रतिष्ठेचा सुवर्ण पदक देवून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. 

आयुषनी एस.आर.एम युनिव्हर्सिटी बंगलोर येथून बी.टेक-मेकॅनिकल इंजिनिअरिंग, एस.पी. जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट दुबई, सिडनी, सिंगापूर येथून एमबीए करून दुबई येथे मल्टीनॅशल कंपनीत कार्यरत आहे.  विदेशात शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार स्विकारतांना आपण रोमांचित झालो अशी भावना आयुषने आमचे प्रतिनिधीशी मनोगत व्यक्त करतांना सांगीतले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!