घराचा कुलूप तोडुन सोन्या-चांदीचे दागीने व नगदी चोरी करणारे दोन आरोपीतांना अटक... चोरीस गेलेला पुर्ण माल हस्तगत तळोधी पोलीस ठाणे ची कारवाई...

घराचा कुलूप तोडुन सोन्या-चांदीचे दागीने व नगदी चोरी करणारे दोन आरोपीतांना अटक... चोरीस गेलेला पुर्ण माल हस्तगत तळोधी पोलीस ठाणे ची कारवाई...



यातील फिर्यादी व कुटूंबिया रुग्णालयीन कामासाठी बाहेरगांवी गेल्याचे संधी साधुन अज्ञात चोरटयांनी त्यांचे घराचे समोरील दाराचाा कुलूप तोडुन आंत प्रवेश करुन आलमारीतील सोन्या-चांदीचे दागीने व नगदी असा एकुण ७२,०००/- रुपयाचा माल चोरुन नेल्याचे तक्रारीवरुन दिनांक ५/३/२०२५ रोजी पोलीस ठाणे तळोधी येथे अपराध क्रमांक २२/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (३), (४) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात येवुन तळोधी पोलीसांनी गुन्हयाचा सखोल तपासात सदर घरफोडी करणारे गुन्हेगारांचा शोध लावुन आरोपी नामे खेमराज आबाजी बारसागडे व आरोपी नामे पुरुषोत्तम मनीराम बांबोडे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेला सोन्या-चांदीचे दागीने व नगदी असा एकुण ७२,०००/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपीचा मा. न्यायालयाकडुन पोलीस कोठडी रिमांड घेवुन पुढील तपास करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी श्री दिनकर ठोसरे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सपोनि श्रीमती संगिता हेलोंडे यांचे नेतृत्वात पोउपनि श्री किशोर मानकर, पोहवा हंसराज सिडाम, सचिन साखरकर, पोअं. राजु चिमुरकर, नरेश फंडे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!