बॅरिगेट तोडून एसटी बस घुसली शेतात
२५ ते ३० प्रवासी गंभीर जखमी
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दिनांक २०/०३/२०२५ ला सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास चिमूर वरून उमरेड नागपूर अहेरी जाणारी एसटी बस क्रमांक. MH 40 CM 4418 ही बस चिमूर बस स्थानक येथून निघाली मात्र पिंपळनेरी च्या जवळच अचानक बस चालक सुनील कुसनाके यांना फिट आली आणि अंदाजे २५ ते ३० प्रवासी वाहतूक करणारी एसटी बस लोखंडी बॅरिगेट ला तोडून रस्त्यालगत असलेल्या शेतात पलटी मारली. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णवाहीकेच्या साहाय्याने चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.व काही प्रवासी गंभीर जखमी असल्याने त्यांना रेफर करण्यात आले आहे. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!