चिमूर तालुक्यात विविध ठिकाणी होत आहे अवैधरित्या रेत्ती ची तस्करी

रेत्ती तस्करी करणाऱ्याला नवपाल व वनरक्षका चा आर्शिवाद

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - भिसी उप वनपरिक्षेत्रातील मौजा पुयारडण, नवेगाव, लावारी, गडपिपरी व सिरसपुर जंगलातील नदी,नाल्यातुन मागील दोन ते तीन वर्षापासुन मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीची तस्करी होत आहे. या जंगलात वण्यप्राणी मोठ्या प्रमाणात राहत असतात.या जंगल परीसरात रेती तस्करी ट्रॅक्टर द्वारे करीत आहे.व या जंगल परीसरात ट्रॅक्टर द्वारे अनेक चोर रस्ते सुद्धा तयार केली आहे.हजारो ब्रास रेती तस्करी जंगलातील पाठ व सगर नाल्या तुन झाली आहे. पुर्ण नदी व नाले रेती तस्करानी सपाट केली आहे.पण वनविभाग यांचे कडून आतापर्यंत कोनतीही मोठी कार्यवाही करण्यात आली नाही.या जंगलाची रक्षा करणारे वनपाल संतोष औतकार व वनरक्षक भानुदास बोरकर गाळ झोपीत असल्याचे चित्र यावरून दिसुन येत आहे.ज्या प्रमाणे अवैध वृक्षतोड या परीसरात होत आहे त्याच प्रमाणे अवैध रेतीची सुद्धा तस्करी वनपाल व वनरक्षक यांच्या आर्शिवादाने होत असल्याची चर्चा होत शेतकरी तथा जनतेमध्ये सुरु आहे.वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांचे कडून या प्रकरणाची चौकसी करून दोषी वर कार्यवाही करण्यात यावी,अशी सामान्य जनते कडून मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!