भिसी परीसरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड

वनपाल यांचा आर्शिवाद असल्याची चर्चा

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - चिमूर तालूक्यातील भिसी वनपरीसरात मागील चार ते पाच महिण्यापासुन अवैध वृक्षतोड होत आहे. परंतु वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी डोळे झाक करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.व ठेकेदार खुले-आम ट्रक द्वारे अवैध वृक्षतोडून करून वाहतूक करीत आहे.भिसी येथील वनविभागा यांचे कडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.एकिकडे झाडे लावा झाडे जगवा सारखे जनहितार्थ नारे देत असतात तर दुसरी कडे वनविभागच अवैध वृक्ष तोड करणाऱ्याना सहकार्य करीत असतात.या मागे भिसी परीसरातील वनपाल संतोष औतकर यांचा मोठा आर्शिवाद असल्याची चर्चा होत  आहे.वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यानी याबाबत सखोल चौकसी करून ठेकेदार व दोषी अधिकारी तथा कर्मचारी वर्ग यांचेवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जनते कडून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!