जागतिक वन्यजीव दिन साजरा

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - शेगाव इथूनच जवळच असलेल्या अर्जुनी येथील सर्वोदय विद्यालय तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात आला.यावेळी तरुण पर्यावरणवादी  मंडळाचे सदस्य जगदीश पेंदाम यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव, शिकार, व वन्यजीवांचे महत्त्व या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच वनरक्षक भोयर यांनी जंगलाचे महत्व यांचेवर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित गावातील प्रथम नागरिक सरपंच सोनाताई हनवते, सर्वोदय विद्यालयाचे शिक्षक पारोधे,जुंबाळे सर जिल्हा परिषद शाळा अर्जुनी येथील मुख्याध्यापक कोणत्या तामगाडगे सर तथा शिक्षिका वनविभागाचे रोजनदारी मजूर गोरख कोकुडे,कुटी मजूर, अग्नि रक्षक आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!