दोन गटातील वाद संपविणारे ठाणेदार यांचा देवस्थान कमेटी, गावकरी यांच्या कडून सत्कार....

दोन गटातील वाद संपविणारे  ठाणेदार यांचा देवस्थान कमेटी, गावकरी यांच्या कडून सत्कार....


वरोरा.... जगदीश पेंदाम

  तालुक्यातील शिल्पग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व इतिहासिक वारसा असलेल्या भटाळा येथे मागील 6 वर्षा पासून विठ्ठल रुख्मिणी, शंकरजी देवस्थान तसेच भवानी माता मंदिर कमेटी मध्ये पदासाठी आणि आर्थिक व्यवहारसाठी वाद सुरु आहे, या देवस्थानच्या नावाने अंदाजे वीस ते पंचेवीस एकर शेती असून मागील कमेटी आपल्या मर्जेतील शेतकरी यांना भाड्याने देत होती तसेच आज पर्यंत चाललेल्या आर्थिक व्यवहार  हे सचिव, कोषध्यक्ष वेगवेगळ्या गटात असल्याने बँक खाते बंद झाले, त्यामुळे देवस्थानचा लाखो रुपयाचा व्यवहार बिना बँक व्यवहार करुन चालवत आहे त्यामुळे या देवस्थाना मध्ये भस्टाचार होत असल्याचे गावकरी यांनी धर्मदाय आयुक्त यांच्या कडे तक्रार दिली असून या देवस्थान कमेटीवर प्रशासन यांची नेमणूक करावी अशी मागणी केली, याच मागणीची दखल घेत धर्मादाय आयुक्त यांनी सतत चार वर्षा पासून आर्थिक व्यवहार बघण्यासाठी निरीक्षक यांची तीन दिवसासाठी नेमणूक केली आहे असे वाद असताना मात्र मागील चार वर्षे सचिव ज्या गटाकडे होते त्यांनी देवस्थान चे काम बघितले मात्र या वर्षी सचिव दुसऱ्या गटाकडे गेल्याने आज पर्यंत जो गट काम पाहत होता त्यांना हे पराभवले नाही म्हणून त्यांनी सचिव गटाचा विरोध करण्यास सुरुवात केली मात्र सचिव गटातील सदस्य आज पर्यंत सचिव तुमच्या गटाकडे होता तुम्ही काम बघितले आज आमच्याकडे आहे आम्ही महाशिवरात्री कार्यक्रम करणार यावर ठाम असताना विरोधी गट मानायला तयार नव्हता, शंकऱजी देवस्थान शिवरात्रीचा कार्यक्रम जवळ आल्याने वाद वाढत गेला शेवटी शेगाव येथील ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांना प्राचारणं करून हा वाद संपवून सदर कार्यक्रम दोन्ही गट मिळून करणार असे सांगून आज पर्यंत चाललेला वाद संपवीला तसेच भोळ्या शंकर यांची लाखो भाविक यांची गैरसोय झाली नाही पाहिजे म्हणून ठाणेदार  योगेद्रसिंग यादव यांनी योग्य ते पाऊल उचलून  निर्णय दिला तसेच तीन दिवस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची काळजी घेत योग्य तो पोलीस कर्मचारी स्टाप बोलावून समस्त भाविकांचे आणि गावकरी यांचे मने जिंकली त्याचीच पावती म्हणून गावकरी आणि देवस्थान कमेटी यांनी ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांचा सत्कार करून पोलीस प्रशासनाचे आभार मानले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!