संजय राऊत यांचा चंद्रपूर येथे युवासेना तर्फे जाहीर निषेध

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - महाराष्ट्र विधानपरीषदेच्या  उपसभापती तथा शिवसेना(शिंदे गटाच्या) महिला आघाडी नेत्या नीलिमाताई गोऱ्हे यांच्याबद्दल आक्षेपार्य विधान केल्यामुळे ऊबाठा गटाचा बोलघेवडा पोपट संजय राऊत यांचा चंद्रपुर,तूकुम येथील एस टी वर्कशोप चौक येथे नारे बाजी करून चप्पल, जुते मारून जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख शैलेश केलझरकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रतील तमाम महिलांचाबद्दल बेताल व्यक्तव्य करून अपमान करणाऱ्या संजय राऊत यांचा जाहीर निषेध करण्यात आला. या निषेध प्रसंगी वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाध्यक्ष चेतन उजवाने,युवासेना जिल्हा समन्वयक मनोजभाऊ खांडेकर,तालुका समन्वयक शिरीष भाऊ वानखेडे,युवासेना शहर प्रमुख पवन यादव, उपशहर प्रमुख कमलेश कुळमेथे,प्रदीप आसुटकर,शुभम स्वप्निल आस्कर,अक्षय बोन्डे,अतुल राजुरकर तथा असंख्य युवासैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!