तेरा लाखाच्या मुद्देमालासह दारू तस्कर अटकेत :मूल पोलिसांची दबंग कारवाई
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्हयात दारूचा अवैध व्यवसाय करण्याचे उद्देशाने दारूची वाहतुक करीत असतांना मूल पोलीसांनी दारूसह १२ लाख ९१ हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन मूल येथील परीविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक प्रमोद चौगुले, पो. हवा. जमीरखान पठाण आणि नरेश कोडापे मूल गोंडपिपरी मार्गावरील नवेगांव भुजला ते बेंबाळ गांवादरम्यान एका शेताजवळ नाकाबंदी करून उभे असतांना संध्याकाळी ७ वाजताचे सुमारास गोंडपिपरी कडून खेडी कडे येत असलेल्या एमएच-३४- सीडी-७११६ क्रमांकाच्या ग्रे रंगाच्या सुझुकी इंडीका कारची तपासणी केली, तेव्हा सदर वाहनाच्या मागील सिट आणि मागील डिक्कीमध्ये ठेवलेल्या खोक्यांमध्यें विदेशी कंपनीची २ लाख ९१ हजार ५४० रूपयाची दारू असल्याचे दिसून आले. यावरून पोलीसांनी सदर वाहनाचा चालक खुशाल भैयाजी बांगडे रा. नांदाफाटा ता. कोरपना जि. चंद्रपूर याला ताब्यात घेवून अटक केली. सदर घटनेत पोलीसांनी २ लाख ९१ हजार ५४० रूपयाच्या विदेशी दारूसह १० लाख किंम्मतीचे वाहन जप्त केले. ताब्यात घेतलेल्या वाहन चालक खुशाल बांगडे यांना विचारणा केली, तेव्हा पोलीसांनी हस्तगत केलेली विदेशी दारू बल्लारशा येथील पवन जयस्वाल यांचेकडून सावली तालुक्यातील व्याहाड येथील निखील मंडलवार यांना पोहोचवून दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामूळे वाहन चालकांच्या बयाणानुसार पोलीसांनी वाहन चालकासह पवन जयस्वाल आणि निखील मंडलवार यांचे विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पवन जयस्वाल आणि निखील मंडलवार यांचा पोलीस शोध घेत असून पुढील तपास पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांचे मार्गदर्शनात प्रभारी ठाणेदार तथा परिविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक प्रमोद चौगुले सहका-यांचे मदतीने करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!