पळसगाव (जाट) येथे शाळेत जागतिक वन दिनानिमित्त मार्गदर्शन.

पळसगाव (जाट) येथे शाळेत जागतिक वन दिनानिमित्त मार्गदर्शन.
(स्वाब संस्थेच्या वतीने वन,पर्यावरण,वन्यजीव व पक्षी, याचे महत्त्व पटवून पक्षी घागर बांधण्यात आली, सामाजिक वनीकरण सिंदेवाही यांचे आयोजन)
सिंदेवाही:
 जागतिक वन दिवसानिमित्त सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पळसगाव (जाट) येथील भारत विद्यालय येथे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा मार्गदर्शन कार्यक्रम सामाजिक वनीकरण सिंदेवाही व स्वाब नेचर केअर फाउंडेशन तळोधी बा. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.
 यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून यश कायरकर, वन्यजीव अभ्यासक तथा अध्यक्ष स्वाब नेचर केअर फाउंडेशन यांनी वन व पर्यावरण संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन केले.  21 मार्च जागतिक वन दिनानिमित्त बोलताना वनाची महत्त्व पटवून सांगितले तर वनापासून मिळणारे उत्पन्न, वन म्हणजे फक्त झाडे नाही तर प्राणी, पक्षी सोबतच मानवांचे भविष्याचा आसरा आहे असे त्यांनी सांगितले. सोबतच 20 मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त सुद्धा सांगताना चिमणीचे महत्व आणि चिमणी शेतकऱ्यांचा मित्र आहे तिचे संरक्षण करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. पक्षी आपला अन्ना स्वतः शोधतात मात्र गावात पाण्याच्या स्तोत्रांचा जवळ जवळ तुटवडा निर्माण झालेला आहे. संपूर्ण धुनी भांडी आणि बाथरूम इनडोअर झाल्यामुळे गावातील पक्षांना पाण्याचा स्त्रोत राहिला नाही. त्यामुळे सर्वांनी आपल्या घरासमोर घराजवळ एक तरी किमान पक्षी घागर बांधावी अशी विनंती केली. या मार्गदर्शन कार्यक्रमानंतर स्वाब संस्थेद्वारे शाळा परिसरामधील उन्हाळ्यामध्ये पक्षांना पाणी पिण्याकरता 'पक्षी घागर' बांधण्यात आली.
या कार्यक्रमाचे संचालन संजय कुमारे सर यांनी तर आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री गेडाम सर यांनी मानले, यावेळी सामाजिक वनीकरणाचे सिंदेवाहीचे क्षेत्र सहाय्यक येनुरकर सर , क्षेत्र सहाय्यक मुलमुले सर , तथा स्वाब संस्थेचे बचावदल प्रमुख जिवेश सयाम, शिक्षण विभाग प्रमुख नितीन भेंडाळे, सर्पमित्र जीवन गुरनुले, सदस्य शुभम निकेशर, चिराग सेलोकर , शाळेचे संपूर्ण शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!