राष्ट्रीयकृत बँक मध्ये खातेदारांना सुविधेचा अभाव.... एकाच काउंटर वरून दैनंदिन व्यवहार सुरू....
राष्ट्रीयकृत बँक मध्ये खातेदारांना सुविधेचा अभाव....
एकाच काउंटर वरून दैनंदिन व्यवहार सुरू....
वरोरा... जगदीश पेंदाम
तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून शेगाव ची ओळख आहे, शेगावची लोकसंख्या दहा हजार च्या वर असून या ठिकाणी नेहमीच आर्थिक व्यवहार, देवाणघेवाण करण्याकरीता ग्रामीण भागातून 50 ते 60 गावातील नागरिक नेहमीच येत असतात,या ठिकाणी जवळपास 40 वर्षापासून राष्ट्रीयकृत इंडियन बँकची एकमेव शाखा असून या बँकेचे हजारोच्या वर खातेधारक आहे परंतु पाहिजेल त्या प्रमाणात खातेधारकांना सुविधा प्राप्त होत नसल्यामुळे मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे..
इंडियन बँक ची शाखा शेगाव मध्ये 40 वर्ष अगोदर निर्माण झाली या ठिकाणी खातेधारकांना बँकेमध्ये रुपये टाकण्याकरीता, काढण्याकरीता, आरटीजीएस करण्याकरीता दोन काउंटर असून या ठिकाणी एकाच काउंटरद्वारे अनेक दिवसांपासून व्यवहार सुरू असून एक खिडकी हे मागील अनेक वर्षापासून बंद आहे, इंडियन बँक मध्ये मोठ्या प्रमाणात खातेधारक वृद्ध नागरिक,महिला,शालेय, विद्यार्थी अपंग नागरिक, कर्मचारी,पेन्शन यांचे खातेधारक महिला बचत गटात खाते,असून व्यापारी लाईनचेही मोठ्या प्रमाणात खातेधारक असल्यामुळे याठिकाणी देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात होत असते..
आजही बँकेमध्ये खातेधारकांना kyc,re-kyc, c_kyc करणे आवश्यक असून मोठ्या प्रमाणात नेहमीच गर्दी असते, अनेक निराधार,शेतमजुरांचे, बोटाचे ठसे येत नसल्यामुळे ग्राहकांना kyc करणे त्रासदायक ठरत आहे, तसेच बँकेमध्ये दोन ते तीन हजार रुपये काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना बँक मधून वापस यावे लागते तसेच बाहेर सुद्धा त्यांचे बोटाचे ठसे येत नसल्यामुळे पैसे निघत नसल्यामुळे त्यांना त्रासदायक ठरत आहे, ऑनलाइनच्या जमान्यात बाहेर बसलेले एजंट हे पैसे काढण्याचे हजारमागे 10 ते 20 रुपये घेत असून पारदर्शक सरकारच्या काळात त्यांना जास्तीचा भुरदंड बसताना दिसत आहे, बँकमध्ये मोठ्या प्रमाणात विशेष करून महीला, स्तनदा माता, विद्यार्थी, गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक यांना गर्दी राहत असल्यामुळे चार ते पाच तास लाईन मध्ये उभे राहून ग्राहकांना पैसे काढावे, टाकावे लागतात त्या ठिकाणी बँक धारकांना बसण्याची सुविधा नसून पिण्याची पाण्याची सुद्धा सुविधा नाही आहे, तसेच ग्राहकांना दुचाकी वाहन पार्क करत असताना आपली गाडी रस्त्याच्या बाजूला ठेवावी लागत असून वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे इंडियन बँक व्यतिरिक्त दुसरी राष्ट्रीयकृत बँक करीता व्यापारीमंडळाच्या वतीने लोकप्रतिनिधीला मागणी करण्यात आली असून जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना निवेदनसुद्धा दिले आहे, यांचे दुर्लक्ष झालेले आहे शेगाव ही तालुक्यातील मोठी बाजारपेठ असून नेहमीच व्यापारी लाईनकडून लाखो रुपयाचा देवाण-घेवान होत असून दुसरी बँक निर्माण झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असुन सुविधा प्राप्त होण्यास मदत होईल विकासाला चालना मिळेल..
शेगाव ही तालुक्यातील मोठी बाजारपेठ असुन व्यापारी,परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठी अडचण होत असते दुसरी अधिकृत बँक निर्माण झाल्यास जनतेला सोयीस्कर होईल...शेगाव व्यापारी त्रिशूल बोंदगुलवार
शेगाव तथा परिसरातील 50 ते 60 गावातील नागरिकांचे बाजारपेठ म्हणून शेगावची ओळख आहे,परिसरातील नागरिक दुकानदार वर्ग शेतकरी निराधार व शालेय विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात बँकेत खाते असल्याने गर्दी होत असते परिणामी वेळेचे नुकसान होऊन त्यांना राहावे लागते त्यामुळे अजून चांगल्या राष्ट्रकूट बँकेची आवश्यकता असून बँकेची खाती विभागल्याने ग्राहकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध होवु शकते..
अक्षय बोंदगुलवार सामाजिक कार्यकर्ता..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!