मेंढपाळाचा मुलगा बनला कर सहाय्यक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश

 

मुल - जुनासुर्ला येथील पाटेवार या मेंढपाळ कुटुंबातील मुलगा सुनिल मुखरू पाटेवार याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील परीक्षेत यश मिळवीत कर सहाय्यक पद मिळविले. त्याने केलेल्या मेहनतीचे कौतुक केल्या जात आहे.

      घरी वडिलोपार्जित मेंढ्या पाळणे हा व्यवसाय असून आजही वडील मेंढ्या पाळतात. मात्र हा व्यवसाय करणे आजच्या युवकांना कष्टाचे असल्याने मुले शिक्षणाकडे वळली आहेत. सुनिलने फार मेहनत करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत 13 वे रँक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनासुर्ला तर दहावीपर्यंतचे शिक्षण श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल जुनासुर्ला येथे झाले. त्यानंतर पदवीचे शिक्षण वाणिज्य शाखेत सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथून पूर्ण करून थेट स्पर्धा परीक्षेकडे वळले. स्पर्धा परीक्षा देत असताना कित्येकदा त्याला अपयशाला सामोरे जावे लागले. परंतु त्याने जिद्द न सोडता मेहनत घेतल्याने यश मिळाले आहे. त्याच्या जिद्दीचे कौतुक मुल तालुक्यात होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!