चार महिन्याच्या प्रदीर्घ अवधी नंतरही केंद्रप्रमुखाचे सुधारीत आदेश निर्गमीत नाहीत
चार महिन्याच्या प्रदीर्घ अवधी नंतरही केंद्रप्रमुखाचे सुधारीत आदेश निर्गमीत नाहीत
जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कार्यरत शिक्षकांमधून सेवाज्येष्ठता व पात्रता नुसार १४ आक्टोबर २०२४ ला केंद्रप्रमुख पदोन्नती ची प्रक्रिया राबवून पदोन्नती देण्यात आली. या पदोन्नती चे आदेश संबंधितांना देऊन काही शिक्षक, केंद्रप्रमुख पदावर रुजू झाले मात्र प्रशासनाच्या गलथान व चुकीच्या कारभारामुळे श्री.पुरुषोत्तम टोंगे विषय शिक्षक सामदा यांना पंचायत समिती मूल मधील मारोडा केंद्राला पदोन्नती देण्यात आली. मारोडा केंद्राला पुर्वीपासून श्री.प्रमोद कोरडे हे नियमित केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असतांना पुन्हा पुरुषोत्तम टोंगे यांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती देवून घोडचूक केलेली आहे. त्यासंबंधी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला कळविले आहे तरी आज तब्बल चार महिन्यांचा कालावधी होऊन सुद्धा संबंधित शिक्षकाचा केंद्रप्रमुख पदोन्नतीचा सुधारीत आदेश काढण्यात प्रशासन दिरंगाई करीत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमान कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. त्यांना जुलै २०२५ मध्ये केंद्रप्रमुख पदाची मिळणारी वार्षिक वेतनवाढीपासून वंचित राहण्यास प्रशासन जबाबदार आहे.तरी त्वरीत सुधारीत आदेश काढून पुरुषोत्तम महादेव टोंगे यांना न्याय द्यावा अशी शिक्षकवर्गात चर्चा सुरु आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!