आधारभूत दराने तुर विक्रीकरिता ऑनलाईन नोंदणीची मुदत २२ फेब्रुवारी पर्यंत

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - केंद शासनाकडून हंगाम २०२४ ते २५ करिता तुर या शेतमालाचे आधारभूत दर शासनाने ७५५०/- रूपये निश्चित कले असुन त्यानुसार आधारभूत दराने तुर खरेदी करण्याच्या दृष्टीने ६ फेब्रुवारी रोजी प्राप्त झालेल्या सूचनेनुसार वरोरा, भद्रावती तालुक्यात तुर उत्पादक शेतकऱ्यांकरिता ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया २४ जानेवारी  २०२५ पासून सुरू झाली असून ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत २२ फेब्रुवारी आहे.शेतकऱ्यांनी आधारभूत दराने तुर विक्रीकरिता ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन वरोरा बाजार समितीचे सभापती डॉ विजय रा. देवतळे ,उपसभापती जयंत रा. देवतळे व सचिव चंद्रसेन सा. शिंदे यांनी केली आहे.शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी करिता नमुना ८ अ, तुर या पीकपेऱ्याची नोंद असलेला चालू वर्षाचा डिजिटल ७/१२, आधारकार्डला लिंक असलेले राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक (जनधन योजने अंतर्गत काढण्यात आलेले बचत खाते देण्यात येऊ नये) शेतीच्या एकत्रित क्षेत्र असल्यास इतरांचे संमतीपत्र इत्यादी कागदपत्रे नोंदणी अर्जासह भरून समितीचे राजीव गांधी मार्केट यार्ड, मोहबाळा रोड वरोरा येथील कार्यालयात २२ फेब्रुवारी पूर्वी सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी.असे बाजार समितीचे सभापती  डॉ विजय रा. देवतळे उपसभापती जयंत रा. देवतळे व सचिव  चंद्रसेन सा शिंदे यांनी म्हटले आहे. शासनाकडून खरेदी संदर्भाने मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच शासनाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून तुरीची खरेदी सुरू होईल तरी सर्व तुर उत्पादक शेतकरी बांधवांनी २२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी व शासकीय आधारभूत दराचा लाभ घ्यावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!