निराधार योजनेचे 4 महिन्यापासून अर्ज प्रलंबित - अर्ज मंजूर करून लाभ देण्याची मागणी

 

सावली - सावली तालुक्यात संजय गांधी निराधार समिती गठीत न झाल्याने 4 महिन्यापासून निराधार योजनेचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे निराधार व्यक्ती लाभापासून वंचित असल्याने अर्ज मंजूर करून आर्थिक लाभ देण्याची मागणी विजय कोरेवार यांचे नेतृत्वात निवेदनाद्वारे करण्यात आली.

        सामाजिक न्याय विभागामार्फत निराधार व्यक्तींना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, कुटुंब अर्थसहाय योजनेचा लाभ दिल्या जातो. या योजनेचा लाभ मिळावा याकरीता विधवा, अपंग, वृद्ध, दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींनी सावली तहसील कार्यालयात अर्ज सादर केले आहे. मात्र 11 ऑक्टोबर 2024 पासून कोणतीच कार्यवाही न झाल्याने शेकडो अर्ज प्रलंबित आहेत. जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी शिफारस न केल्याने संजय गांधी निराधार अशासकीय समिती गठीत झालेली नाही परिणामी अनेक निराधार व्यक्ती लाभापासून वंचित आहेत. ज्यावेळेस समिती नसते त्यावेळेस तहसीलदार हे समितीचे अध्यक्ष असतात त्यामुळे तहसीलदार यांनी नियमानुसार अर्ज मंजूर करून लाभ द्यावा अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार, श्रीकांत बहिरवार, राजू कंचावार, अशोक कन्नाके, निरूपा मडावी, नथुजी मडावी यांनी नायब तहसीलदार चांदेकर यांचेकडे निवेदन सादर केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!