नाफेडची सोयाबीन खरेदी सुरू करा - राजू चिकटे माजी सभापती
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - शेतकऱ्यांचे मरण हे सरकारचे धोरण याच उद्देशाने सरकार शेतकऱ्यांचे हाल करताना दिसत आहे एकीकडे नाफेडची सोयाबीन खरेदी सरकारने बंद केल्यामुळे शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट कोसळलेले आहे त्यामुळे तात्काळ नाफेडची सोयाबीन खरेदी सुरू करण्याची मागणी राजुभाऊ चिकटे यांनी प्रशासनाकडे केलेली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात सोयाबीनचे पिके घेतली आजही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये महागडी खते,बी, बियाणे औषधी वापरून रब्बी हंगामात सुद्धा सोयाबीन पिके लागवड करण्यात आलेली आहे, मात्र खाजगी व्यापारी आजही अनेक शेतकऱ्यांकडून एक हजार रुपयाने कमी किमतीत सोयाबीन खरेदी करत असुन सोयाबीनला योग्य प्रमाणात भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, एकीकडे नाफेडची खरेदी 4892 रूपये असून खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची पिडवणूक करताना दिसत आहे, तसेच सरकारची उदासीन धोरणामुळे महागडी खते, औषधी, वापरून शेतीकरीता कर्ज काढून खर्च सुद्धा निघणे शेतकऱ्यांना अवघड झालेले आहे, त्यामुळे तात्काळ नाफेडची 4892 रुपयांची सोयाबीन खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी सभापती राजूभाऊ चिकटे यांनी प्रशासनाकडे केलेली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!