चिमूर शहरात खुलेआम सट्टा व्यवसायास चालना

पोलिसांचे दुर्लक्ष 

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर क्रांती भूमी म्हणून ओळख असलेल्या चिमूर शहरात खुलेआम राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई लगत असलेल्या तहसील कार्यालय जवळ तसेच जुना बस्टॉप व शहरातील ठिक - ठिकाणी किराणा दुकानात अनेक चहा टपरीवर सट्टा मटका व्यवसाय दिवस रात्र सुरु असून याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.हे सर्व अवैध व्यवसाय करणारे मोठ्या प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी यांच्या अगदी जवळचे असून पोलीस प्रशासनाचा सुद्धा यांना आशीर्वाद असल्याचे चित्र दिसून येत आहे. अक्षरशः पोलिसाचे वाहन त्यांच्या समोर असतांना देखील सट्टा पट्टी कापणे सर्रास सुरूच असते यास काय म्हणावे? यामुळे अनेकांच्या आयुष्याची राख रांगोळी झाली असून बेरोजगार मुले या व्यवसायकडे वळली आहे. तर वयोवृद्ध म्हातारे सुद्धा सट्टा पट्टी कापित असतांना दिसतात अशा स्थितीत बोरोजगारी असलेल्या चिमूर शहरात चोरी गुंडागर्दी आणि अवैध व्यसयास चालना मिळाली आहे.सध्या श्रीहरी बालाजी महाराज यांची घोडा यात्रा सुरु असून विविध राज्यातील भाविक भक्त तसेच मिनी बाजार घेऊन आलेली जनता सुद्धा याच्या आहारी गेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!